गोंदिया सहकारी बँक निवडणूक २०२५ निकाल जाहीर – कोण जिंकलं, कोण हरलं?

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२५ : निकाल अपडेट


गोंदिया – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२५ मधील निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलने आघाडी घेतली आहे. तसेच महायुतीच्या सहकार पॅनलने काही महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे.

एकूण २० जागांपैकी काँग्रेस व परिवर्तन पॅनलने ११ जागा जिंकल्या असून महायुती व सहकार पॅनलने ९ जागा मिळवल्या आहेत.

तालुका/विभागवार विजयी उमेदवारांची यादी:

1. आमगाव – भेरसिंग नागपुरे (महायुती)

2. देवरी – प्रमोद संगीडवार (महायुती)

3. सालेकसा – बंटी कटरे (काँग्रेस)

4. गोंदिया – केतन तूरकर (महायुती)

5. सडक अर्जुनी – गंगाधर परशुरामकर (काँग्रेस)

6. गोरेगाव – दुर्गा ठाकरे (काँग्रेस)

7. तिरोडा – विजय रहांगडाले (महायुती)

8. औद्योगिक प्रतिनिधी – अरुण दुबे (काँग्रेस)

9. अर्जुनी मोरगाव – पुस्तोदे (भाजप - महायुती)

10. दूध संघ – पंकज यादव (काँग्रेस)

11. मजूर प्रतिनिधी – विजय राठोड (काँग्रेस)

12. जंगल कामगार – गप्पू गुप्ता (काँग्रेस)

13. मच्छी व्यवसाय – बाला हलमारे (काँग्रेस)

14. इतर – डॉ. अविनाश जायसवाल (महायुती)

15. इतर – रचना गहाने (महायुती)

16. इतर – प्रिया हरिनखेड़े (महायुती)

17. इतर – राजकुमार बडोले (महायुती)

18. इतर – विनोद कन्नमवार (महायुती)

19. बिनविरोध – प्रफुल्ल अग्रवाल (काँग्रेस)

20. इतर – राजेंद्र जैन (महायुती)

या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने ग्रामीण व कामगार वर्गात चांगली पकड मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. महायुतीने मात्र शहरी व औद्योगिक क्षेत्रात आपली ताकद दाखवली आहे. हे निकाल जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या