नमस्कार मंडळी!
नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांना पुन्हा एकदा नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती गृहविभागाच्या अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.
कोणते तालुके नक्षलग्रस्त घोषित?
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव हे चार तालुके आता अधिकृतपणे नक्षलप्रभावित क्षेत्रात गणले गेले आहेत. याशिवाय संपूर्ण गडचिरोली जिल्हा यापूर्वीप्रमाणेच नक्षलग्रस्त क्षेत्रात राहणार आहे.
नक्षलमुक्त भारत मोहिमेचा भाग
मार्च २०२६ पूर्वी देश नक्षलमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात विशेषत: पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या भागात नक्षलवादी हालचाली दिसून आल्याने याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.
पोलीस महासंचालकांच्या अहवालानंतर निर्णय
राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा पुनरआढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या अहवालावर आधारित हा निर्णय घेण्यात आला. या भागात वाढती नक्षल चळवळ, जंगल भागातील अडचणी आणि नागरिकांच्या सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे.
गोंदिया व गडचिरोलीच्या नागरिकांसाठी सूचना
या भागातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क ठेवणे, अनोळखी व्यक्तीविषयी तत्काळ माहिती देणे आणि सुरक्षेसंदर्भात सहकार्य करणे गरजेचे आहे. सरकारकडून लवकरच या भागांमध्ये नक्षलविरोधी उपाययोजना अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या