महिलांसाठी सुवर्णसंधी! मोफत पीठ गिरणी योजना सुरू – अर्ज कसा कराल, संपूर्ण माहिती येथे बाचा.

महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी सुवर्णसंधी! मोफत पीठ गिरणी योजना 2024 अंतर्गत महिलांना 90% अनुदानावर गिरणी सुरू करण्याची संधी. अर्जाची प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे आणि लिंक येथे जाणून घ्या


नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
आपल्या देशात महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. अशाच योजनांपैकी एक आहे – मोफत पीठ गिरणी योजना 2024. ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी यामधून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शासन गिरणी खरेदीसाठी ९०% पर्यंत अनुदान देणार आहे. या आर्टिकल मध्ये मोफत पीठ गिरणी योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे कसा अर्ज करायचा कोणते कागदपत्र लागतात हे सर्व गोष्टी इथे दिले आहेत तर महिती संपूर्ण वाचा.

पीठ गिरणी योजना कोणासाठी आहे?

ही योजना खास करून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय महिलांसाठी आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं, आणि घराबाहेर न पडता व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.

पीठ गिरणी योजनेसाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:

महिला अर्जदार ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावं.

अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणं आवश्यक.

वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पेक्षा कमी असणं आवश्यक.

स्वत:च्या नावावर बँक खाते असणं बंधनकारक आहे.

पीठ गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. जात प्रमाणपत्र

3. उत्पन्नाचा दाखला

4. रहिवासी प्रमाणपत्र

5. बँक खात्याचा तपशील (पासबुक/IFSC)

6. फोटो (पासपोर्ट साईज)

7. BPL कार्ड (असल्यास)

8. शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन

पीठ गिरणी योजनेला किती अनुदान मिळणार?

महिलांना गिरणी खरेदीसाठी ९०% अनुदान दिलं जातं. उर्वरित १०% रक्कम अर्जदार महिलेला भरावी लागते.

उदाहरणार्थ, जर गिरणीची किंमत ₹20,000 असेल, तर सरकार ₹18,000 देईल आणि तुम्हाला फक्त ₹2,000 भरावे लागतील.

पीठ गिरणी या व्यवसायातून काय फायदा होतो?

रोजचं धान्य दळण्याचं काम मिळतं

नियमित उत्पन्न मिळू शकतं
गावातच व्यवसाय सुरू करता येतो

एकाच वेळी उत्पन्न + सामाजिक प्रतिष्ठा मिळते

पीठ गिरणी योजनेला अर्ज कसा करावा?

1. जवळच्या पंचायत समिती, तालुका कार्यालय, किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन फॉर्म मिळवा.

2. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा

3. अर्जाची पडताळणी करण्यात येते

4. पात्र असल्यास अनुदान थेट बँक खात्यावर जमा केलं जातं

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुद्धा भरता येतो. यासाठी अधिकृत वेबसाईट आहे:

👉 https://ah.mahabms.com

या वेबसाईट वर जा आणि आँनलाईन फॉर्म भरून घ्या.

विशेष सूचना

महिला वर्गाने या संधीचा फायदा घ्यावा. अगदी कमी गुंतवणुकीत तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा! घरीच काम करुण चांगले पैसै कमवा आणि आत्मनिर्भर बना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या