पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा; रस्ते पाण्याखाली, अंबा आणि गोदावरी नद्या इशारा पातळीवर. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.
Pune Nashik Rain Update: नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! राज्यात पुन्हा एकदा पावसाने तडाखा दिला असून पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (१९ जून) सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी कमरेइतकं पाणी साचल्याचं चित्र आहे.
रायगड : नागोठणे शहरात पूरसदृश्य परिस्थिती, अंबा नदीचा इशारा पातळी ओलांडला
रायगड जिल्ह्यात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असून, पावसाचा प्रचंड जोर सुरू आहे. रोहा आणि सुधागड तालुक्यातील नागोठणे, पाली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबा नदीने धोका पातळी ओलांडली असून पाणी नागोठणे शहरात घुसल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. नागोठणे बसस्थानक देखील पाण्याखाली गेलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. पाली-खोपोली मार्गही बंद करण्यात आला आहे.
खेड : जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, खाडी पट्टा संपर्कहीन
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मटन मार्केट परिसरात पाणी शिरल्याने प्रशासनाने सायरनद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खेडकडील सर्विस रोड पाण्याखाली गेला असून खाडी पट्ट्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, भिडे पुलावर पाणी
पुणे शहर आणि परिसरात सकाळपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने धरणातून मुळा-मुठा नदीत २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुण्यातील भिडे पूल जलमय झाला असून आणखी पाऊस झाल्यास तो पूर्णपणे पाण्याखाली जाईल, अशी शक्यता आहे. लोणावळा परिसरात मळवली ते देवळे गावाचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना वळसा मारावा लागत आहे.
नाशिक : गुडघाभर पाण्यातून वाहने, गोदावरीची पातळी वाढली
नाशिक शहरात देखील पावसाने कहर केला आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून रामकुंड, गोदाघाट परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना अर्ध्या तासातच गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हवामान विभागाचा अलर्ट : पुढील ४८ तास महत्त्वाचे
हवामान खात्याने पुणे, रायगड, नाशिकसह कोकणातील काही जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आणि सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

0 टिप्पण्या