उन्हाचा कहर: देशातील सर्वाधिक तापमान महाराष्ट्रात, तेलंगणा दुसऱ्या स्थानावर..


Digital Gaavkari

नमस्कार मंडळी, मे महिना जवळ येत असतानाच देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथे 45.6 अंश सेल्सियस, तर चंद्रपूर शहरात 45.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. महाराष्ट्रानंतर ओडिशातील झरसुगुडा येथे 45.4 अंश सेल्सियस तापमानासह दुसरे स्थान आहे.महाराष्ट्रातील अकोल्यात 45 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले असून, ते देशात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. तेलंगणातील निझामाबाद येथे 44.5 अंश सेल्सियस तापमानासह चौथे स्थान आहे. याशिवाय, छत्तीसगढमधील मंडला येथे 43.8 अंश सेल्सियस, गुजरातमध्ये 43.7 अंश सेल्सियस आणि राजस्थानच्या बारमार येथे 43.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या