आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांनो खबरदार! आता जिल्हाधिकारी तुम्हाला काढणार बाहेर.


Digital Gaavkari News

वृद्ध माता-पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासनच चांगला दणका देणार आहे. अशा मुलांना आता जिल्हाधिकारी बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. वेळप्रसंगी या मुलांचा पगारही रोखला जाणार आहे. तर ज्येष्ठ माता-पित्याला न्याय मिळवून दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलासा मिळणार आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात.

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत केली जाते.

ज्या व्यक्तींना मुलं त्रास देतात किंवा त्यांना घरातून बाहेर काढतात तसेच मुलं म्हणून त्यांना कोणतीही मदत करत नाही.


त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात आणि अर्ज केल्यावर त्यांना अश्या प्रकरणात मदत केली जाऊ शकते.

ज्यात मुलांकडून पोडगी मिळून दिली जाऊ शकते किंवा त्या आई-वडिलांच्या नावाने घर असेल तर त्या मुलांना घराच्या बाहेर काढून त्या आई वडिलांना घर मिळवून दिलं जाऊ शकतं.

कायद्यानुसार आई-वडिलांच्या नावावर घर असताना मुलं त्यांना बाहेर काढू शकत नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या