संकल्पाशिवायशिवाय स्वप्नपूर्ती नाही- प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे.


Digital Gaavkari News

"समर्थ महाविद्यालय लाखनी येथे अर्थसंकल्प 2025 वर चर्चासत्र"

लाखनी राष्ट्र असो वा व्यक्ती प्रगती साधावयाची असेल तर सर्वप्रथम संकल्प करावे लागतील केवळ संकल्प करून भागणार नाही हे संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याकरिता नियोजन लागेल विकसित व आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केलेले नियोजन म्हणजे यंदाचा 2025 चा संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प होय असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी केले ते चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून बोलत होते या अर्थसंकल्पात AI करिता केलेली 500 कोटी तरतूद,IIT मध्ये 6500 विद्यार्थ्यांचा वाढीव कोटा, रिसर्च व इनोवेशन करिता दिलेले 20000 कोटी, सर्व जिल्हास्तरावर स्थापन होणारे कॅन्सर हॉस्पिटल या गोष्टी निश्चितच सुखावणाऱ्या आहेत मात्र कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची एम एस पी ची मागणी अजूनही स्वप्नच आहे, आजही अर्थसंकल्पातील सर्वाधिक तरतूद ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याकरिता राखून ठेवावी लागते याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2025ला अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पामध्ये सांगितलेल्या टॅक्स स्लॅब व जीएसटी टॅक्स याबद्दल डॉ. सु. ना बनसपाल यांनी मार्गदर्शन केले. अर्थसंकल्प 2025-26 मध्ये महिलांसाठी असणाऱ्या योजना विषयी माहिती डॉ.संगीता हाडगे यांनी दिली. अर्थसंकल्पामध्ये महिला सक्षमीकरणासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुनंदा देशपांडे यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांविषयी असलेल्या योजना यावर प्रकाश टाकला. आणि मागील अर्थसंकल्प आणि यावर्षीचा अर्थसंकल्प यामध्ये शेतकऱ्यावर केल्या गेलेल्या खर्चाविषयी माहिती दिली. प्रा. कैवल्य गभने यांनी अर्थसंकल्पाचा शेअर मार्केट वरील परिणाम याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. युवराज जांभुळकर यांनी केले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या