लाखनी भंडारा: समर्थ महाविद्यालय लाखनी येथील बी.ए. भाग-१ गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी समर्थ नगर येथील 'न्यू गुडलक लेडीज टेलर्स अँड पिको फॉल सेंटर' या महिला उद्योजकता केंद्राला दि. 12/2 /2025 रोज बुधवारला भेट दिली.
सदर भेट समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच नोकरी मिळणे शक्य नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता स्वयंरोजगाराद्वारे अर्थार्जन करता येते. स्वयंरोजगार करतांना कोणत्या व्यवसायाची निवड करावी? त्याकरिता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? तसेच मानवीय संसाधनांबरोबरच कोणत्या भौतिक संसाधनांची आवश्यकता असते? याविषयी विद्यार्थिनींनी विस्तृत माहिती मिळविली. विद्यार्थिनींनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करून स्वावलंबी होणे. हे या महिला उद्योजकता केंद्र भेटीचे प्रमुख उद्देश होते. सदर भेटीचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभागातील प्रा. प्रतिभा वंजारी आणि प्रा.डॉ. स्मिता गजभिये यांनी केले. या भेटीमध्ये प्रणाली वंजारी, स्नेहल दखणे, कशिश शेंडे, साक्षी काडगाये, साक्षी अतकरी रिया मोटघरे, श्रुती बांते, श्रुती अतकरी, सानिया मेश्राम आणि प्रियल खोब्रागडे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सदर भेटीच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व घटकांचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या