विशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप.पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालोरा (चौ) येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चा शुभारंभ.


पवनी- ग्रामपंचायत पालोरा चौ/ च्या वतीने सार्वजनिक सभामंडप आंबेडकर वार्ड पालोरा येथे प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 टप्पा 2 अंतर्गत 75 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आज दि. 22 फेब्रुवारी 2025 ला विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमितभाई शाह, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत *"प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2"* अंतर्गत 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाचा कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04.45 वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे. आज ग्रामपंचायत पालोरा चौ च्या वतीने आंबेडकर वार्ड सार्वजनिक सभामंडप येथे प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आज दि. 22 फेब्रुवारी 2025 ला विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यात ज्यांना घरकुल मंजूर आहे अशा लाभार्थ्यांच्या घराचे भूमिपूजन व ज्या लाभार्थ्यांचे घरकुल यशस्वीरित्या पूर्ण झाले अश्या लाभार्थीचे गृह प्रवेश आज करण्यात आले.यावेळी सरपंच शिशुपाल रामटेके, उपसरपंच प्रवीण खोपे, ग्रामसभा सचिव मुख्याध्यापिका ढबाले मॅडम, सूत्र संचालक शिक्षक रामचंद्र धारगावे , ग्रा. सदस्य,बालाराम वैद्य, .संजय ठवरे,रामचंद्र गिऱ्हेपूजे ग्रामपंचायत सदस्या ज्योती गिऱ्हेपुंजे, रत्नमाला गिऱ्हेपुंजे,कविता धाबेकर,सविता काजरखाणे लेझीमा गोस्वामी,ग्रामविकास अधिकारी श्यामकुमार बिलवने पोलिस पाटील श्रीहरी गिऱ्हेपूजे, यशवंतराव धाबेकर,हरिदास सुपारे,विनायकराव फुंडे, देवानंद खोपे,पुरुषोत्तम गिऱ्हेपूजे,किशोर शहारे, शीतल भुरे कृषी सहाय्यक ,महेशजी चोपकर महसूल सेवक ,संगीताताई गिऱ्हेपूजे दुर्गाताई कावळे,वसंतराव फुंडे,देवचंद साठवणे ,कैलास दिघोरे .देवराम कावळे,ताराचंद गिऱ्हेपूजे, सुनीता मस्के,ईश्वरी गिऱ्हेपूजे,रोजगार सेवक रवीजी खोपे व गावातील घरकुल लाभार्थी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायत स्तरावरून घरकुल लाभार्थ्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यक्रम उपस्थितानी बघितला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृह मंत्री अमित भाई शाह तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे निवासस्थान मिळवून दिल्याने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त घरकुल लाभार्थ्यांनी एक सुखद आनंद व्यक्त करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी लाभार्थ्यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या