डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
ladki bahin yojana January installment 2025 : नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे! लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे, म्हणजेच जानेवारीचा हप्ता, हा आता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
3690 कोटी रुपयांच्या निधीस आता सरकारने मान्यता दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितले आहे ते समजून घ्या.
मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण योजना" या योजनेअंतर्गत 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळेच आता महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की, 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरित होणार आहे.
म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. आता काही दिवसांतच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात होईल.
तर बहिणींनो, काळजी करू नका! ₹1500 चा हा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
महत्त्वाची माहिती होती, तुमच्या सर्व महिलांना हा संदेश नक्की शेअर करा!
धन्यवाद! जय हिंद! जय महाराष्ट्र!
0 टिप्पण्या