डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
Maharashtra Guardian Minister List 2025: नमस्कार मंडळी, महाराष्ट्र सरकारने अखेर आज (18 जानेवारी 2025) नवीन पालकमंत्र्यांची यादी (Guardian Minister List) जाहीर केली आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन तब्बल एक महिना उलटल्यावर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
धनंजय मुंडेंना मोठा धक्का - पालकमंत्रिपद डावललं!
BJP - NCP सरकारच्या नव्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पालकमंत्रिपद देण्यात आले नाही. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजप आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध केला. अखेर सरकारने मोठा निर्णय घेत बीडचा पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे दिलं.
रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे (Aditi Tatkare)
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून मोठा वाद रंगला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी रायगडसाठी दावेदारी केली होती. मात्र अखेर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
Maharashtra Guardian Minister List 2025: कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
जिल्हा
पालकमंत्री
1. गडचिरोली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सह. आशिष जयस्वाल
2.ठाणे, मुंबई शहर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
3.पुणे, बीड
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
4.नागपूर, अमरावती
चंद्रशेखर बावनकुळे
5.अहिल्यानगर
राधाकृष्ण विखे पाटील
6.नाशिक
गिरीश महाजन
गिरीश महाजन
7.वाशिम
हसन मुश्रीफ
8.सांगली
चंद्रकांत पाटील
9.जळगाव
गुलाबराव पाटील
10.यवतमाळ
संजय राठोड
11.मुंबई उपनगर
आशिष शेलार, सह. मंगलप्रभात लोढा
12.रत्नागिरी
उदय सामंत
13.धुळे
जयकुमार रावल
14.जालना
पंकजा मुंडे
15.नांदेड
अतुल सावे
16.चंद्रपूर
अशोक ऊईके
17.सातारा
शंभूराजे देसाई
18.रायगड
अदिती तटकरे
19.सिंधुदुर्ग
नितेश राणे
20.लातूर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
21.नंदुरबार
माणिकराव कोकाटे
22.सोलापूर
जयकुमार गोरे
23.हिंगोली
नरहरी झिरवाळ
24.भंडारा
संजय सावकारे
25.छत्रपती संभाजीनगर
संजय शिरसाट
26.धाराशीव
प्रताप सरनाईक
27.बुलढाणा
मकरंद जाधव
28.अकोला
आकाश फुंडकर
29.गोंदिया
बाबासाहेब पाटील
30.कोल्हापूर
प्रकाश आबिटकर, सह. माधुरी मिसाळ
31.वर्धा
पंकज भोयर
32.परभणी
मेघना बोर्डीकर
33.पालघर
गणेश नाईक
नवीन पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी जाहीर झाली असून यामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
0 टिप्पण्या