युनिक इंग्लिश स्कुल भंडारा येथे स्नेह सम्मेलन साजरा करण्यात आला.


Digital Gaavkari News

Bhandara News: दिनांक २०-०१-२०२५ रोजी यूनिक इंग्लिश स्कूल भंडारा शाळेच्या विशाल प्रांगणात १३ वा वार्षिक महोत्सव साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पुजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन मा. डॉ. संजय कोल्ते IAS जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधिश भंडारा यांच्या हस्ते झाला असुन कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी, विशेष अतिथी मा.उमेश नंदागवळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत जिल्हा परिषद,भंडारा मा.आशिष बोरकर, पोलीस निरिक्षक, चंद्रपुर, मा. अनिरुध्द भोयर, अध्यक्ष महा.प्रदेश,केंद्रिय मानव अधिकार सेवा संगठन नई दिल्ली, मा. मनोज चवरे अध्यक्ष, विदर्भ प्रदेश केंद्रिय मानव अधिकार सेवा संगठन नई दिल्ली, मा. स्वप्निल भोवते, तालुका अध्यक्ष / वक्ता,भंडारा केंद्रिय मानव अधिकार सेवा संगठन नई दिल्ली मा.दिनेश वासनिक, सामाजिक कार्यकर्ता आणि जिल्हा अध्यक्ष अन्याय निवारण, समिती भंडारा मा. नितेश डोंगरे, संयोजक भंडारा मा.सुरेंद्र वाघाये अदासा या सर्वांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य अरविंद मेश्राम,, मुख्याधिपिका, सौ. अरुणा उके, केंद्रिय मानव अधिकार सेवा संगठणचे विदर्भ संगठणमंत्री मा. सौरभ रामटेके तसेच केंद्रिय मानव अधिकार सेवा संगठनेचे प्रिती गजभिये उपाध्यक्षा जिल्हा भंडारा, माधुरी सरादे जिल्हा सचिव भंडारा, प्रतिमा गोस्वामी सह सचिव जिल्हा भंडारा, नम्रता बागडे उपाध्यक्ष, ता. भंडारा, शीतल धकाते, सचिव ता. भंडारा, उषा नागदेवे सह सचिव ता भंडारा, मा. दयारामजी मते अदासा आणि सर्व पालकगण यांच्या उपस्थित वार्षिक सोहळा पार पडला कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रणाली सपाटे शिक्षिका यांनी केले. संगीत व तांत्रीक देखरख कु. रिया पानबुडे आणि सौ. ऊर्वशी नशिने शिक्षिका यांनी केला, मेकअप, वेशभुषा, सजावट, व्यवस्था, आणि स्वागत इत्यादी शिक्षिका सुनिता हलमारे, सौ. सलमा घरडे, सौ. लता भोयर सौ. मंगेशा नाटकर, कु. सायली मोहरकर सौ. अनिता भुरे, सौ. लता कावळे, सोनाली कश्यप, प्रमोद शेंडे वाहन चालक यांनी केला. कार्यक्रमाचे संयोजन, व्यवस्था, फोटोग्राफी, अतिथी यांचे स्वागत असे मोलाचे सहकार्य माननिय नितेश डोंगरे यांनी केले.

या प्रसंगी श्री. दयारामजी मते अदासा यांनी शिक्षणाच्या माध्यमातुन उत्तम सामाजिक कार्य केल्यामुळे त्यांना माननिय जिल्हाधिकारा भंडारा यांच्या हस्ते गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन माननिय जिल्हाधिकारी,मा.प्रमुख अतिथी, मा.मुख्य अतिथी, मा. विशेष अतिथी, आणि मा. अतिथी यांच्या हस्ते विद्यार्थी अभय मेश्राम, प्रिनी डोंगरे, अनुष्का डोंगरे, अजिंक्य मेश्राम, शिवांश हुकरे, सानवी वाहणे, देवांशु वंजारी, दिया गभणे, प्रिन्सु वंजारी, हिमानी वाढवे, गौरी बांते, अक्षरा पांडे, या सर्वांचा कौतुक करुन बक्षिस वितरण करण्यात आले. आणि सांस्कृतीक कार्यक्रमाची सुरवात होवुन कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात व्यवस्थीत पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या