पालकमंत्री संजय सावकारे यांचा म.अनिसच्या वतीने भारतीय संविधान पुस्तक देऊन सत्कार.


Digital Gaavkari News

भंडारा:
 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने दि. 15 अगस्त 2024 रोजी पालकमंत्री डॉ. गावित यांना घर घर संविधान राबविण्याचे आदेश शासनाने काढावे असे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने घर घर संविधान राबविण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या स्वागत व्हा या उद्देशाने भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त व म.अनिसच्या वतीने गेल्या 35 वर्षापासून संविधान जागर हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याने आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजता मा. पालकमंत्री संजय सावकारे यांचा भंडारा येथे भारतीय संविधानाचे पुस्तक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंक, देऊन त्यांच्या विश्रामगृह भंडारा येथे सत्कार करण्यात आला .त्यावेळी भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भीवगडे , कार्याध्यक्ष नितेश बोरकर, यांनी सत्कार केले त्यावेळी सौ. चंद्रकलाताई भोपे ,सौ.कविता लोणारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या