डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी, महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असून, त्याची अधिकृत घोषणा २६ जानेवारी २०२५ रोजी होईल अशी बातमी सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तथापि, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही.
राज्य सरकारने अशा कोणत्याही निर्णयाची घोषणा केलेली नाही तसेच अधिकृत स्तरावरून याबाबत कोणतीही माहिती अजून उपलब्ध नाही.
काही वर्षापूर्वी सरकारने नवीन जिल्ह्यांसाठी एक प्रस्ताव सादर केला होता मात्र या प्रस्तावावर अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही .
कारण नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खूप मोठी प्रशासकीय तयारी यासाठी आवश्यक असते ज्यासाठी दीर्घकालीन योजना आणि तयारीची आवश्यकता असते.त्यामुळे, सध्या सोशल मीडियावर जी नवीन जिल्ह्याची पोस्ट व्हायरल होत आहे या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून ती फेक आहे असे निदर्शनास आले आहे.
0 टिप्पण्या