भंडारा जिल्हा परीषद अध्यक्षा सौ. कविता जगदीश उईके.



डीजीटल गावकरी 

भंडारा :-
महाराष्ट्र जिल्हा परीषद आरक्षण 2022 संदर्भात अंतर्गत ठरल्याप्रमाणे अडिज वर्ष कालावधी नंतर रोष्टर प्रमाणे जिल्हा परीषद, अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व विवीध विषयाचे सभापती पदाची निवडणुक ऐरणीवर आहे.त्यानंतर सभापती पदाच्या शर्यती वाढल्या असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय जिल्हा परीषद अध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीच्या महीला प्रवर्गाला आरक्षित असल्यामुळे सौ. कविता जगदीश उईके यांची वर्णी लागणार की काय?असे स्पष्ट संकेत दिसू लागले आहे. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रभावाने विखुरलेले नेते मंडळी काय खेळी करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भंडारा जिल्हा परीषद अंतर्गत अनुसुचित जमाती प्रवर्गातील किन्ही एकोडी जिल्हा परीषद क्षेत्रातील जिल्हा परीषद सदस्या माहेश्र्वरी नेवारे ह्या अनुसुचित जमाती प्रवर्गातून निवडूण आल्या असल्या तरीऑर्गनायझेशन ऑफ राईट्स ऑफ ट्राईबल च्या वतीने त्यांचे नातेवाईक विषेश मागास प्रवर्गातील असल्याने त्या त्या अनुसुचित जमाती च्या आरक्षित जागेवर कशा म्हणून विभागीय आयुक्त नागपूर येथे आव्हान दिले साक्षी पुराव्याच्या आधारे विभागीय आयुक्ताच्या आदेशाने पुर्व लक्षी प्रभावाने त्यांचे भंडारा जिल्हा परीषद सदस्य पद अनर्ह ठरविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परीषद भंडाराच्या अध्यक्षा सौ.कविता जगदीश उईके होणार असल्याचे चित्र दिसत आहे.माञ सदर प्रकरणी स्थगीती किंव्हा न्यायालयीन आव्हाने अश्या न्यायप्रविष्ट प्रकरणालामुळे अस्थीरता निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या चिघळलेल्या राजकीय संतापामुळे सत्ता गमावतील काय अश्या चर्चेला ऊत आला आहे.सभापती पदाच्या लालच साठी पक्ष खेळी करण्यापेक्षा अनुसुचित जमाती च्या महीला सदस्या सौ.कविता जगदीश उईके यांना जिल्हा परीषद अध्यक्ष पद दिले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे.

नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या कार्यालयाकडून पारित आदेशानुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया, यांचे दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या आदेशान्वये सौ. माहेश्वरी हेमराज नेवारे यांचे लग्नापूर्वीचे नाव माहेश्वरी दुर्गाप्रसाद सुरजजोशी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत 18- किन्ही एकोडो ता. साकोली, जि. भंडारा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असल्याने या आदेशाब्दारे पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना जिल्हा परिषद, भंडारा सदस्य पदासाठी अनर्ह ठरविण्यात आले असल्याने जिल्हापरिषद अध्यक्ष पदासाठी कविता उईके च सरस असल्याचे जनतेचे मत ऑर्गनायझेन ऑफ राईट्स ऑफ शेडुल ट्राईब संघटनेचे संघटक प्रमुख जगदिश मडावी यांनी राज्यातील 85000 अनुसूचित जमाती च्या लोकांवरील अन्याय होत असल्याचे सांगून खऱ्या अनुसूचित जमाती च्या लोकांना अध्यक्षाच्या पदावर संधी देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी प्रामाणिक योगदान करणार असा विश्वास व्यक्त केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या