Bhandara Ordnance factory News: भंडाऱ्यात आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, ५ जखमी .


Digital Gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर


Bhandara Ordnance factory Spot: भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोटाची तीव्रता आणि बचावकार्य

स्फोटामुळे LTC-23 इमारत पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे. जेसीबीच्या मदतीने मलब्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याचा आवाज ५ किलोमीटर पर्यंत ऐकू गेला, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीत दारूगोळा (Explosives) तयार केला जातो, त्यामुळे या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, ८ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने आणि मालकाने कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भात दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून मदत मिळेल, पण कंपनीच्या मालकांकडूनही नुकसानभरपाई वसूल केली जावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. "घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पोहोचले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे. जखमींना तातडीने मदत दिली जाईल आणि सखोल चौकशी करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.

स्फोटाचे नेमक कारण काय?

अद्याप स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, दारूगोळ्यांच्या असुरक्षित साठ्यामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरू असून सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या