भंडारा:- जिल्हयातील पी. एम. श्री, जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव येथील इयत्ता 10 वी चा विद्यार्थी यथार्थ सैनपाल वासनिक याला दि.26 जानेवारी 2025 ला प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर भारत सरकार च्या भारतीय रक्षा मंत्रालय आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन द्वारा आयोजित विरगाथा 4.0 ह्या स्पर्धेमध्ये भंडारा तालुक्यातील मुजबी येथील सैनपाल वासनिक यांचा मुलगा यथार्थ वासनिक याने शासन स्तरावर घेण्यात आलेल्या विरगाथा -04 स्पर्धेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने भावनीक चित्र तयार देशात तृतीय क्रमांकाचे स्थान पटकाविले व भंडारा जिल्ह्याचे नाव लौकीक केले असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी देशातील 100 प्रतिवाभान विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला होता त्यात इयत्ता 9 वी ते 10 वी ह्या गटातून यथार्थ ने पेंटिंग ह्या चित्रकलेत देशातून 3 रा स्थान मिळविला आहे. त्यामुळे शासनाने सर्व खर्चासह 26 जानेवारी देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे आ भारत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते विरगाथा अवार्ड, मेडल, प्रशस्तीपत्रक आणि 10 हजारांचे धनादेश स्वरूपात पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
विशेषतः भंडारा जिल्ह्यातील हा पुरस्कार प्राप्त करणारा पाहिलाच विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते म्हणुन नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या उषा धारगावे गायकवाड , सुधाकर, आंबटवार कु.मेश्राम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि भंडारा जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे , तसेच प्राथमिक चे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, मोहाडी गटशिक्षणाधिकारी मनिषा गजभिये यांनी यशस्वितेसाठी अभिमान व्यक्त करून कौतुक आहे.
यथार्थ वासनिक च्या प्रधान मंत्र्यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात प्रश्नाची निवड व विरगाथा पुरस्कारातील यशस्वीततेसाठी मुजबीचे सरपंच प्रेम धारगावे, तलाठी सौ. बबिता वासनिक, अर्चना भोयर, शेखर बोरकर, धीरज बांते, संजय पडोळे, सौ. अल्का हटवार, गंगाधर भदाडे, राजु निंबार्ते, जागेश बांते आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या