भंडारा बायसिकल असोसिएशन व्दारा जिल्ह्या सायक्लोथॉन -4 ला उस्फुर्त प्रतिसाद.




भंडारा:- भंडारा येथे आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा सायकल असोसिएशन व्दारा सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील भंडारा ,कोल्हापूर, परभणी, लातूर ,मुंबई ,वर्धा , आदी जील्ह्यातून काही हरियाणा ,चंदीगड ,मध्यप्रदेश, दिल्ली ,राज्यातील स्पर्धकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

या सायकल असोसिएशन च्या सायकलिंग स्पर्धेत 550 पेक्षा अधिक स्पर्धकांनी ह्या सायकल स्पर्धेचा आनंद घेतला. सोबत विविध शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 10 वर्षाच्या आतील मुलापासून ते 75 वर्षांच्या आजोबांपर्यंत वयाचे स्पर्धक सहभागी झाले .

बायसिकल असोसिएशन चा स्तुत्य उपक्रम.

बायसिकल असोसिएशन भंडारा हे मागील कितीतरी वर्षापासून जनतेने सायकल चालवून नियमित व्यायाम करुन आरोग्य सुदृढ ठेवावे या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा व परेड घेत असतात त्यामागील एकमेव उद्देश असा की सायकलिंग मुळे होणारे फायदे जे शारीरिक, मानसिक व आपल्या शहरात होणाऱ्या प्रदूषण पासुन मुक्ती मिळावी असा प्रयत्न आहे.

शहरातील उद्योगपतींचा सक्रीय सहभाग

जुण ते सोन म्हणतआरोग्य तंदुरूस्त राहावे म्हणून सायकल स्पर्धा यशस्वी होण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील बरेच उद्योगपतींनी सक्रीय सहभाग दर्शविला ज्यात नक्षत्र ज्वेलर्स ,श्री साई ट्रेडिंग, विघ्नहर्ता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, मीना रेसिडनसी हॉटेल, साईराज मोटर्स, इंद्राक्षी आय केअर व आयबँक, स्पर्श हॉस्पिटल, नाकाडे नर्सिंग होम, ओम हॉस्पिटल, मेघरे हॉस्पिटल, समर्पण ब्लड बँक, रोटरी क्लब , लायन्स क्लब, भंडारा च्या उद्योजकांनी सक्रीय सहभाग घेतला.

या सायकल रॅली स्पर्धेची सुरुवात माधवनगर स्टेडियम पासून आमदार नरेन्द्र भोंडेकर व बायसिकल असोसिएशनचे अध्यक्ष पंकज हरडे ह्यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.

स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ओपन सीनियर सिटीजन गटात भंडाऱ्यातील सायकल स्वारांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले तसेच बायसिकल असोसिएशन भंडारा तर्फे सर्व गटात भंडारा शहरातील सायकल स्वारांकरिता प्रत्येक गटात पाच पाच असे विशेष बक्षिसे देण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वीतते करता भंडारा ट्राफिक पोलीस, व सरकारी रुग्णालय भंडारा ह्यांचे विशेष सहकार्य लाभले  या सायकल स्पर्धेत ओपन ग्रुप मध्ये पुरुष गटात 123 महिला गटात 57 व पावर राईड मध्ये 140. किड्स ग्रुपमध्ये 325 हून अधिक स्पर्धकांनी आनंद घेतला . नूतन कन्या शाळा, जेसीस कॉन्व्हेन्ट, , रॉयल पब्लिक स्कूल स्प्रिंग डेल स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

या स्पर्धेच्या यशस्वीतते करिता बायसिकल असोसिएशन भंडाराचे पदाधिकारी व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले, स्पर्धेचे विजेत्यांमध्ये

खुला पुरुष गट 50 कि.मी. प्रथम कोल्हापूरचे सिद्धेश पाटील, व्दितीय क्रमांक हनुमान चोपडे, यांना मिळाला तर तृतीय क्रमांक शंभुराजे यादव यांना मिळाला. भंडारा येथील प्रथम क्रमांक प्रणय लांजेवार यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक गौरव शेलोकर यांना मिळाला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शैलेश काळे , चतुर्थ क्र. दिनेश मारवाडे , पाचवा क्रमांक दादाभाऊ ठाकरे यांना देण्यात आले.

खुला गटातील महिला 30 की.मी. स्पर्धेत प्रथम वैष्णवी गभने, द्वितीय क्रमांक कविता देवी, तृतीय क्रमांकाचे स्थान निता देवी यांनी मिळविले. भंडारा येथील प्रथम क्रमांक घेणारी महीला साधना मेश्राम, व्दितीय क्रमांकाच्या मानकरी सौ. विशाखा जिभकाटे ह्या ठरल्या,तृतीय क्रमांक स्नेहा मनापुरे, यांनी मिळविला चतुर्थ क्रमांक प्रतीक्षा तरारे यांनी घेतला तर पाचवा क्रमांक शिल्पा मेश्राम  20 की.मी.ज्येष्ठ पुरुष स्पर्धक डॉ. योगेश नाकाडे, मनोज दोनोडे , राजकुमार बावनकर राजकुमार नंदेश्वर , झामेश्र्वर कोरे, अरुण आनंद, महेन्द्र काटेखाये, ललित दोनोडे ,
20 की.मी. ज्येष्ठ महिला स्पर्धक भंडारा च्या मंगला मारवाडे, मंदा बावनकुळे,

लहान मुलांमध्ये विजेते स्पर्धक म्हणुन नरेंद्र सोमवंशी,अरुण मलगे, अतुल प्रधान, सौम्य रामटेके, मण गिरीपुंजे, सागर वाडणेरकर, प्रणय आपुरकर, हर्शिता बोरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज धाबेकर व अमोल मानापुरे ह्यानी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या