![]() |
आंब्याचा लोनच. |
डिजिटल गावकरी
Durgaprasad Gharatkar.
नमस्कार मंडळी आंब्याचे लोणचं म्हटल की तोंडाला पाणी सुटलं असेलच कारण आपन आपल्या आहारातील खारट आणि आंबट पदार्थ म्हणजे आंब्याचे लोणचे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लोणचे ही पारंपरिक मराठी रेसिपी असून, कच्च्या कैऱ्यांचा वापर करून तयार केले जाते. या विस्तृत रेसिपीत कापलेल्या कैऱ्यांना मसाला, हळद, लाल तिखट, हिंग आणि भाजलेल्या मेथीदाण्यांसोबत मुरवून लोणचं तयार करण्याची सुलभ पद्धत आम्ही या ब्लॉग मध्ये सांगितली आहे. टिकाऊ आणि चविष्ट लोणचं बनवण्यासाठी योग्य प्रमाणात तेलाचा वापर आणि स्वच्छतेची खबरदारी कशी घ्यावी, याबद्दल महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. या लोणच्याचा आस्वाद पोळी, भात, किंवा पराठ्यासोबत जर घेतला तर खूप चविष्ट लागतो.
आंब्याचे लोणचे सामग्री आणि बनवण्याची पद्धत
कच्चे कैरी (आंबे) – 1 किलो
मीठ – 100 ग्रॅम (साधारण 5 टेबलस्पून)
मोहरी (राय) पावडर – 50 ग्रॅम
हळद – 2 टेबलस्पून
लाल तिखट – 100 ग्रॅम
हिंग – 1 टिस्पून
मेथीदाणे – 3 टेबलस्पून
तेल (शेंगदाण्याचे/सूर्यफूल) – 200 मिली
रेसिपी (तयारीची पद्धत)
1. कैऱ्या स्वच्छ करणे आणि कापणे:
कच्च्या कैऱ्या (आंबे) स्वच्छ धुवून घ्या.
टॉवेलने पुसून पूर्ण कोरड्या करा.
मोठ्या टिकाऊ चाकूने कैऱ्यांचे 1 इंचाचे चौकोनी तुकडे करा.
बिया फेकून द्या.
2. मसाला तयार करणे:
एका मोठ्या ताटात किंवा परातीत मोहरी पावडर, लाल तिखट, हळद, हिंग, आणि मीठ मिक्स करा.
मेथीदाणे कोरडे भाजून त्याची मोठी पूड करून घ्या आणि तयार मसाल्यात मिसळा.
3. कैऱ्यांमध्ये मसाला मिसळणे
कापलेल्या कैरीच्या तुकड्यांना तयार मसाला चांगल्या प्रकारे लावा.
हाताने किंवा चमच्याने सर्व तुकडे मसाल्याने माखून घ्या.
4. तेल गरम करणे
एका कढईत 200 मिली तेल गरम करा.
तेल थोडे थंड होऊ द्या (गरम तेल थेट कैऱ्यांवर ओतायचे नाही).
थंड झालेले तेल लोणच्यावर ओता. तेलामुळे लोणच्याचा टिकाऊपणा वाढतो.
5. लोणचं मुरवणे
लोणचं एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत/बाटलीत भरा.
लोणच्याला 7-10 दिवस मुरण्यासाठी ठेवा.
रोज एकदा स्वच्छ चमच्याने हलवा, जेणेकरून मसाला आणि तेल व्यवस्थित मिसळेल.
6. लोणचं कधी तयार होतं?
साधारण 10-12 दिवसांनी लोणचं व्यवस्थित मुरेल आणि खाण्यासाठी तयार होईल.
लोणचे साठी महत्त्वाच्या टिप्स
साहित्य पूर्णपणे कोरडे असावेओलसरपणा राहिल्यास लोणचं खराब होऊ शकते.
लोणचं नेहमी साफ आणि कोरड्या चमच्याने काढा.
हवाबंद बरणीमध्ये लोणचं ठेवून थंड, कोरड्या जागी साठवा.
तेलाची पातळी नेहमी कैऱ्यांपेक्षा थोडी वर राहावी, यामुळे लोणचं जास्त काळ टिकेल.
मित्रानो आंब्याच्या लोणच्याचा आनंद घ्या!
हे लोणचं भात, पोळी, पराठा, किंवा भजीसोबत खायला अत्यंत स्वादिष्ट लागते.
0 टिप्पण्या