डिजिटल गावकरी
Durgaprasad Gharatkar
Coconut chutney recipe : नमस्कार मंडळी नारळाची चटणी ही दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रातील जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणाची चव द्विगुणीत करणारी ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करता येते. डोसा, इडली, वडे, उपमा, भजी, किंवा साध्या जेवणासोबत ही चटणी खूप स्वादिष्ट आणि सुन्दर लागते. या रेसिपीत ताज्या नारळासोबत हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि काही खास मसाले वापरून तयार केलेली नारळाची चटणी कशी बनवायची याची सविस्तर माहिती आम्ही या ब्लॉग मध्ये दिली आहे.
नारळाची चटणी बनवण्याची साहित्य
ताजा नारळ (खवलेला) – 1 कप
हिरव्या मिरच्या – 2-3 (चवीप्रमाणे)
लसूण – 2-3 पाकळ्या
जिरे – 1 टीस्पून
चिंच किंवा लिंबाचा रस – 1 टीस्पून
मीठ – चवीप्रमाणे
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
पाणी – ¼ कप (गरजेप्रमाणे)
फोडणीसाठी:
तेल – 1 टेबलस्पून
मोहरी (राय) – 1 टीस्पून
कढीपत्ता – 6-8 पाने
हिंग – 1 चिमूट
चटणी बनवण्याची पद्धत
1. मिश्रण तयार करणे:
ताजा नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, कोथिंबीर, आणि मीठ मिक्सरमध्ये टाका.
त्यात थोडेसे पाणी घाला आणि बारीक वाटून घ्या.
वाटताना आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घाला, पण चटणी जास्त पातळ होऊ देऊ नका.
बारीक, एकसंध आणि मऊसर चटणी तयार झाल्यावर एका वाटीत काढून घ्या.
2. फोडणी (तडका) देणे:
एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा.
त्यात मोहरी टाका आणि तडतडू द्या.
मग कढीपत्ता आणि हिंग घाला आणि काही सेकंद परता.
ही फोडणी तयार चटणीवर ओता आणि हलकेसे ढवळून घ्या.
नारळाची चटणी कशी सादर करावी
ही नारळाची चटणी डोसा, इडली, उपमा, वडे, पराठे, किंवा भजीसोबत सर्व्ह करा.
ही चटणी गरमागरम भातासोबत देखील खूप चवदार लागते.
नारळाची चटणी महत्त्वाच्या टिप्स पाहा
ताज्या नारळाचा वापर केल्यास चटणी अधिक स्वादिष्ट होते.
चवीनुसार लिंबाचा रस किंवा चिंच घालून चटणीला आंबटसर चव देऊ शकता.
जास्त दिवस टिकवायची असल्यास, चटणीला फोडणी देऊन फ्रीजमध्ये ठेवा.
लसूण नको असेल तर तो वगळू शकता अश्याप्रकरे तुम्ही घरीच नारडाची चविष्ट चटणी बनवू शकता.
0 टिप्पण्या