सत्यपाल महाराज यांच्या हस्ते जयेंद्र देशपांडे रक्तवीर-रूग्णमित्र म्हणून सन्मानित



नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी

भंडारा :-
जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व्यक्ती जयेंद्र गुलाब देशपांडे यांना जागतिक दिव्यांग दिना निमित्त जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग बांधवांनी सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते रक्तवीर - रूग्णमित्र म्हणून शाल, स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, खरं तर दिव्यांग बांधवांनी केलेले सत्कार प्रशंसनीय आहे. वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने जयेंद्र देशपांडे यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देऊन अविरत कार्य करीत आहेत, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय कार्यालये पासुन तर रूग्णांची सेवा पर्यंत सतत कार्यरत आहेत, स्वतःचे पंचेवीस वेळा रक्तदान करून अनेक गरजुंचे जीव वाचवण्याचे मोलाचे कार्य देशपांडे यांनी केले.आरोग्य तपासणी शिबिर, डोळ्यांचे शिबीर,रक्तदान शिबीरे सारखे अनेक उपक्रम आयोजित करून जनमानसात लोकप्रियता मिळवली.याची खरी पावती म्हणून जिल्ह्यातील प्रहार च्या दिव्यांग बांधवांनी जागतिक दिव्यांग दिना निमित्त स्थळ बडगे सेलिब्रेशन हाॅल लाखनी च्या प्रांगणात सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते जयेंद्र देशपांडे यांचा सत्कार मोठ्या थाटामाटात साजरा योगेश्र्व र घाटबांधे प्रहार दिव्यांग जिल्हा सचिव भंडारा, एजाज अलि दिव्यांग जेष्ठ जिल्हा कार्यकर्ता,सुनीलभाऊ कहालकर प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष लाखनी, अश्विनीताई भिवगडे सामाजिक कार्यकर्ते, प्रेमचंद निर्वाण , रविंद्र आगलावे, माणिक फेंडर आणि उपस्थित सर्व सन्माननीय जनतेच्याच सहकार्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो अशी भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या