संविधान सन्मान प्रतियोगिता पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ सोहळा उत्साहात साजरा

 


नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी

भंडारा:- येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजीत संविधान दिनाचे निमित्ताने संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षा 2024 गुणवंतांचा गुणगौरव बक्षीस वितरण समारंभ, व जागतिक मानवाधिकार दिन दि.10डिसेंबर 2024ला साजरा करण्यात आला .

संविधान सन्मान प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते उद,गारले की, केंद्रीय मानवाधिकार संघटनच्या वतीने आयोजित संविधान सन्मान परीक्षामुळे विद्यार्थ्यांना बालवयातच संविधाचे बाळकडू डोज दिले जात असल्याने त्यांना त्यांचे हक्क व मुलभूत अधिकार तसेच  विविध विभागाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा स्तुत्य उपक्रम आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन म्हणाले की,महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी या संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेत सहभाग घेऊन गुणवत्ता प्राप्त केल्याने सन्मानास पात्र आहेत पण संविधानातील कायदेशीर बाबी समजून घेऊन तसे अनुपालन केले गेले पाहिजे.मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी यांनी पुर पीडितांसाठी व कोरोणा काळात अन्न धान्य वितरण कार्य हे मोलाचे योगदान आहे.विद्यार्थ्यांना संविधान व थोर पुरुषांचे विचारसाठी प्रेरीत करणारे कार्य हे प्रगतीचा संदेश देणारे कार्य आहे.

       या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बीजु गवारे म्हणाले की,भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे व विस्तृत संविधान आहे .सविधानील कायदेशीर बाबी समजून योग्य मार्गाने अनुकरण करण्याची गरज आहे. संविधानात अनेक मुलभूत हक्क व अधिकार आहेत पण काही कायदेशीर निर्बंध पण आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्यांनी रशियातील सर्वोच्च न्यायाधिशांचा परवाना रद्द करण्यात आल्याचा दाखला देत कायद्याचा पालन करण्याचा संदेश दिला.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भंडारा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब सांगतात की, संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना  हर घर संविधान शासनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व परिस्थितींचा अभ्यास करून समता, स्वतंत्रता, बंधुता तत्वावर आधारित मोठे विस्तृत संविधान लिहिलेले आहे . मात्र नैतिक मुल्य जोपासले जात नसल्याबाबत चिंता व्यक्त करून  संविधानातील तरतुदींचे पालन करण्यासाठी संविधान वाचनासाठी प्रशस्निय कार्यक्रम असल्याचे विचार मांडले तर भारतीय वण सेवा प्राप्त भंडारा जिल्हा वण उपरक्षक राहुल गवई म्हणाले की विद्यार्थ्यांनी संविधान एक कायदा आहे त्याला वाचून त्याप्रमाणे अमलबजावणीसाठी संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षा हा उत्कृष्ट मार्ग असल्याने संघटना शैक्षणीक क्षेत्रात भरीव कार्य करीत आहे.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. संजय कोलते यांचे मार्गदर्शन लाभले तर तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक नूरूल हसन यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे मुख्यमार्गदर्शक न्यायाधीश तथा  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बिजू बा गवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून भंडारा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांचे मोलाचे योगदान लाभले आणि प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा उपवनरक्षक  राहुल गवई यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकरी क्षीरसागर केंद्रिय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले,सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे  अधिव्याख्याता ॲड. विजय कुमार कस्तुरे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता चुरे , प्रामुख्याने उपस्थीत होते.

या संविधान सन्मान प्रतियोगिता बक्षीस व वितरण दीक्षांत समारंभात राज्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चंद्रपूर जिल्ह्यातील यश राकेश ठोंबरे याने पटकाविला त्याला रोख रक्कम 10हजार रुपये, ट्रॉफी सन्मान पत्र, व संविधान पुस्तिका   प्रदान करण्यात आले, राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावनारी  महाराष्ट्र हायस्कूल ची विद्यार्थिनी श्रेया विजय बागडे, हिला पाच हजार रुपये रोख, ट्रॉफी,सन्मान पत्र व भारतीय संविधान पुस्तक देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पुरस्कार नगर परिषद  गांधी विद्यालयाची जयश्री कामठे ने मिळविले तिला तीन हजार रुपये रोख स्मृती चिन्ह सन्मान पत्र शाळेला संविधान पुस्तिका प्रदान करण्यात आले. चौथे क्रमांक नानाजी जोशी विद्यालयातील श्रेया गणेश हटवार हिने घेतले तिला दोन हजार रुपये रोख स्मृतचिन्ह, सन्मान पत्र व शाळेला संविधान पुस्तिका प्रदान करण्यात आले. पाचवे क्रमांक वैनगंगा ज्युनिअर कॉलेजच्या कु. अनवी बांडेबुचे हिला मिळाले तिला रोख रक्कम एक हजार रुपये स्मतिचिन्ह, सन्मान पत्र, व शाळेला संविधान पुस्तिका प्रदान करण्यात आले.तर गांधी विद्यालय कोंढा ची कु.जानवी धनराज वैद्य, सावित्रीबाई फुले ची कु . आनंदी वाट, संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय येथिल मयंक कावळे, पंचशील शाळा भंडारा ची कु. सोनाली ताईतकर तसेच कु.सुचिता लालचंद कोळवते, जिज्ञासा खोब्रागडे यांना पाचशे रुपये रोख, ट्रॉफी,सन्मानपत्र, प्रदान करून उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिवाय समाजाती लोकांपुढे आदर्श उभे करणारे व्यक्तिमत्व म्हणून देहदान करणारे प्रदीप घाडगे,. समुद्रे, तसेच सावरी मुरमाडी सरपंच ज्योती देवानंद नंदेश्वर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले तर नृत्य कलेतून  आंतराष्ट्रिय कलावंत प्रा. प्रियदर्शन सोनटक्के यांनी सर्वांचे मनोरंजन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेखर बोरकर व सौ. श्वेता सुरज मिश्रा यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी , सोपान रंगारी, नाशिक चवरे, जयेंद्र देशपांडे , महेन्द्र तिरपुडे, पंकज वानखेडे,प्रवीण भोंदे, सुर्यकांत हुमने, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  जयेंद्र देशपांडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या