सूचना न देता पाडलेले अतिक्रमण पूर्ववत करावे सोशल फोरम चे तहसीलदार साकोली यांना निवेदन .


डिजिटल गावकरी न्यूज
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी


भंडारा :-साकोली येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी पमिता सुरेश राऊत हिचे नावाने असलेले ४० वर्षांपूर्वीचे अतिक्रमण कसलीही पूर्व सूचना न देता काढल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी राऊत कुटुंबीयांना बांधकाम पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात यावे. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात तहसीलदार साकोली यांना निवेदन देण्यात आले आहे. तहसिलदाराचे प्रतिनिधी अव्वल कारकून रामभाऊ मेश्राम यांनी निवेदन स्वीकारले आहे. तहसीलदार यांचेकडून काय कारवाई केली जाते, याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.

पमिता सुरेश राऊत यांचे ४० वर्षापासून गुजरी चौक येथे अतिक्रमण असून त्यावर विटा सिमेंट चे पक्के बांधकाम करून कॉम्प्युटर प्रिंट, जॉब वर्क चे दुकान त्यांचे पती चोखोबा राऊत यांनी लावले होते. यावर त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाची सोय होत असे. भूमीअभिलेख कार्यालय साकोली येथे तशी नोंद आहे. पण मुख्याधिकारी नगर परिषद साकोली यांनी कसलीही पूर्व सूचना न देता सोमवार(ता.९ डिसेंबर) रोजी जेसीबी चे साहाय्याने अतिक्रमण काढण्याचे नावावर विटा सिमेंट चे बांधकाम पाडून राऊत कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आणलेली आहे. अतिक्रमण काढतांना लेखी अथवा तोंडी सूचना दिलेली नाही. त्यामुळे राऊत कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन हेतू पुरस्पर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना न्याय देऊन कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे व मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी. या करिता मुख्याधिकारी नगर परिषद साकोली यांना पमिता सुरेश राऊत यांचे बांधकाम पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात यावे. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे वतीने तहसीलदार साकोली यांना निवेदन देण्यात आले आहे. सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम, भारतीय बौद्ध महासभा साकोली चे अध्यक्ष विलास मेश्राम, उपाध्यक्ष अशोक रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यादोराव गणवीर, ओबीसी महासंघ साकोली चे अध्यक्ष सुरेश मेश्राम, सोशल फोरम चे तालुका महासचिव दुलीचंद तिरपुडे, भारतीय बौद्ध महासभेचे सोनू राऊत, सामाजिक कार्यकर्ता अश्विन बडोले, विक्की राऊत, अमोल टेंभूर्णे, निलेश बडोले, सोशल फोरम चे तालुका सचिव सुरेश राऊत यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या