भोजापुर ग्रामपंचायत अंतर्गत कलहामुळे ग्रामविकासाची कामे रखडली?


Digital Gaavkari
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी


भंडारा:- येथून जवळच असलेल्या भोजापुर ग्रामपंचायत ग्रामविकासाची अनेक कामे रखडली असुन निवडूण येणारे ग्रामपंचायत पदाधिकारी मोठी अश आश्वासने देऊन निवडूण येतात माञ प्रत्येक्षात कामाच्या वेळी निजी स्वार्थ व मोठेपणाच्या ढकोसला प्रवृत्ती मुळे ग्रामस्थांच्या समस्या निराकरण व ग्रामीण विकास कामांना अडथळा निर्माण होतो असाच प्रकार भोजापूर ग्रामपंचायत येथे अनेक महिन्यान पासून घडत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. दिनांक 16 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत भोजापूर येथील सरपंच सीमा जयेंद्र मेश्राम यांच्या सहीनीशी ग्रामपंचायतच्या सभागृह येथे दुपारी करण्यात 1 वाजता वाजता विशेष आमसभा आयोजीत करण्यात आली आली होती त्या सभेमध्ये 25 ते 30 ग्रामवासी हतर होते , तसेच ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी विजय गोरडवार व सरपंच सीमा जयेंद्र मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य विशाल ग्यानीराम नखाते, पल्लवी पाटील , पंकज सार्वे गुरुनाथ युवराज सीरसाम उपस्थीत होते. माञ उपसरपंच लोकेश मेश्राम सह इतर सहा ग्रामपंचायत सदस्य नेहमी प्रमाणे गैर हजर होते. सतत ग्रामपंचायत सदस्य गैरहजर रहात असल्यामुळे बहुमताने ठराव पारीत करुण विकास कामे करण्यासाठी अडथला निर्माण होत असल्याने गावाचा विकास खुंटला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सतत गैरहजर सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दि.10डिसेंबर ला ठरवलेली ही विशेष आमसभा कोरम अभावी स्थगित करून 16 डिसेंबर ला रोजी घेण्यात आली होती. पण तरीही ग्रामपंचायत पदाधिकारी गैर हजर असल्याने ग्रामवासियांमध्ये रोष दिसून आलें.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या