PM Internship Yojana 2024: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना मिळणार 5000 हजार रुपये .


PM Internship Yojana 2024

नमस्कार मंडळी,भारतातील तरुण वर्गाला प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने २०२४ मध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना सरकारकडून आर्थिक पाठबळासह कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आणि intership मध्ये त्यांना 5000 रुपये प्रति महिना मिळणार आहे त्याच बरोबर शासनाचा इतर सुविधा त्यांना मिळणार आहेत या लेखात योजनेबद्दल सविस्तर माहिती त्याचे लाभ, पात्रता, नोंदणी प्रक्रिया, आणि यासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पीएम इंटर्नशिप योजना २०२४ म्हणजे काय ?


प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना म्हणजे तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देण्याची संधी आहे. या योजनेत पाच वर्षांत एक कोटी इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात १.२५ लाख इंटर्नशिपच्या जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे तरुणांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून उद्योगातील गरजा समजून घेण्यासाठी चांगले होईल म्हणून ही internship योजना राबविल्या जात आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेचे उद्दिष्ट


पीएम इंटर्नशिप योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे:

1. तरुणांचा विकास: तरुणांना रोजगाराच्या तयारीसाठी आवश्यक कौशल्य प्रदान करणे.
2. प्रत्यक्ष अनुभव: उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचे ज्ञान मिळवून देणे.
3. राष्ट्रीय कौशल्य विकास: उद्योगांमधील तरुणांमधून गुणवत्ता वाढवणे.
4. अर्थिक पाठबळ: आर्थिक मदतीच्या माध्यमातून दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे.

योजनेच्या मुख्य बाबी

आर्थिक लाभ योजनेअंतर्गत प्रत्येक इंटर्नस ₹५,००० प्रति महिना स्टायपेंड मिळेल. यात ₹४,५०० सरकारकडून आणि ₹५०० संबंधित कंपनीकडून दिले जाईल. प्रवेशानंतर ₹६,००० ची एकरकमी मदतही मिळेल.

इंटर्नशिप क्षेत्रे : तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, वित्तीय सेवा, शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात संधी दिल्या जातील.

पात्रता PM Internship scheme eligibility criteria


२१ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार असावा

ज्यांनी कमीतकमी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे आणि पूर्णवेळ शिक्षणात नाहीत.

शिक्षण: १०,१२, किंवा आयटी आय , असणे अनिवार्य आहे,

यामधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींना सरकारी आरक्षण धोरणांनुसार संधी उपलब्ध होईल.

पीएम इंटर्नशिप नोंदणी आणि निवड प्रक्रिया PM Internship registration process.

इच्छुकांनी PM Internship Portal खालील वेबसाईट वर आपले नोदणी registration करावे.
https://pminternship.mca.gov.in

या वेबसाईट वर आपले फॉर्म भरून घ्यावे

2. निवड प्रक्रिया : अर्जदारांच्या कौशल्यावर आधारित शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया केली जाते.

4. प्रवेश कालावधी: ऑक्टोबर १२ ते 10 नोहेंबर दरम्यान नोंदणी करता येईल, तर नोव्हेंबरमध्ये निवड प्रक्रिया पार पडेल, आणि डिसेंबर २०२४ पासून पहिल्या बॅचला सुरुवात होईल.

पीएम इंटर्नशिप योजनेचे फायदे (PM Internship Yojana 2024 benefits)

व्यावसायिक अनुभव : या योजनेतून तरुणांना प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळतो, जे भविष्यात त्यांच्या रोजगार संधींना चालना देईल.

आर्थिक मदत: स्टायपेंड आणि विविध प्रकारची आर्थिक मदत मिळून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते.

सुरक्षा कवच : या internship मध्ये पीएम जीवन ज्योती विमा योजना आणि पीएम सुरक्षा बिमा योजना अंतर्गत विमा कवच मिळते.

पीएम इंटर्नशिप योजना २०२४ मधून तरुणांना रोजगारक्षम बनवून त्यांचे आयुष्य उन्नत करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपसाठी तरुणांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे उद्योगातील तज्ज्ञता आणि रोजगारक्षमता वाढण्यास मदत होईल असा प्रधानमंत्री याचा उद्देश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या