
Vidhansabha 2024 : राज्यात निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर ला निकाल लागणार आहे अशात्याच आता काल विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास शेवटचा दिवस होता त्यामुले आता अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली आहे मात्र आता राज्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीचा राजकीय परिस्थिती मध्ये यंदा विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती मात्र बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घ्यावे त्यासाठी शेवटचा क्षणात महायुती आणि महाविकास आघाडी मधील वरिष्ठ नेत्यांची मन धरणी देखील करण्यात आली होती मात्र महायुती आणि महाविकास आघाडीलां काही ठिकाणी यश आले आहे तर अनेक ठिकाणी बंडखोर आपले उमेदवारी अर्ज देखील कायम ठेवले आहेत त्यामुळे आता अनेक विधानसभा मतदार संघात तिरंगे आणि चौरंगी लढत होणार असून याचा मोठा फटका हा घटक पक्षांचा अधिकृत उमेदवारावर पडण्याची दाट शक्यताआहे .
याशिवाय आता बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच डोकेदुखी वाढली आहे पुण्यातील कसबा मतदार संघात महाविकास आघाडी मध्ये बंडखोरी झाली आहे कमल व्यवहारे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र ते निवडणूक लढण्यासाठी ठाम आहेत त्यामुळे आता पुण्यातील कसबा निवडणूक ही चुरशची होणार असल्याचे दिसू येत आहे तर मालेगांव मध्ये महायुती मध्ये बंडखोरी झाली आहे मालेगावात बंडू काका बच्छा यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर भाजपचे बंडखोर उमेदवार कुणाल सूर्यवंशी देखील निवडणुकीच्या रिंगना आहेत या ठिकाणी आता अद्वय हिरे दादा भुसे आणि बंडू काका बछाव अशी तिरंगी लढत होणार आहे.
तसेच हिंगनघाट विधानसभा मतदार संघात देखील महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला या मतदार संघात महविकास आघाडी कडून अतुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या शिवाय दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदार संघ कोपरी पाचखाड़ी मतदार संघात महाविकास आघाडी मध्ये देखील बिगाड़ झाली ली आहे कारण कांग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली होती त्यांनी आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला आहे तर वाशिम मधे रिसोट विधानसभा मतदार संघात भाजपचे नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोर करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटचा दिवशी त्यांनी
आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे या मतदार संघात
तिरंगी लढत होणार आहे.त्यामुले आता यंदा विधानसभेत चांगली लढत होणार असल्याचा दिसत आहे.
0 टिप्पण्या