
नरेंद्र मेश्राम
भंडारा :-साले कुणबी पाचशे रुपयात विकले जातात........ असे वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकऱ्याचा लाखनीतील सकल कुणबी समाजाच्या वतीने निषेध नोंदविला.
विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग आला असून प्रचारात अनेक नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. असाच प्रकार यवतमाळ येथील वणी शहरात झाला. वणी शहरात भाजपा कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी वणी येथील भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याची जीभ घसरली. "साले कुणबी पाचशे रुपयात विकले जातात. कुणब्यांची अवस्था विजेच्या खांब्यावर मुतणाऱ्या कुत्र्यासारखी आहे "अशे आक्षेपार्ह विधान केले. या विधाणामुळे कुणबी समाजात भाजप पदाधिकारी सुधीर साळी आणि भाजप पक्षाबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पक्षाने संबंधित पदाधिकाऱ्याला पक्षातून निलंबित करावं व कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी अशी समाजाच्या वतीने मागणी होत आहे.लाखनी येथील सकल कुणबी समाजाच्या वतीने निषेध नोंदविला असून यासंदर्भात राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार लाखनी मार्फत निवेदन पाठविण्यात आले. सुधीर साळीवर कायदेशीर कारवाई करावी याकरिता पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखनी यांना कुणबी समाजाच्या वतीने तक्रार निवेदन देण्यात आले.कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी न मागितल्यास त्याची जबर किंमत भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मोजावी लागेल असा इशारा कुणबी समाजाचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर, सचिव रामदास सार्वे,गंगाधर लुटे, माधवराव भोयर, उमेश सिंगनजुडे, मधूकर मोहतुरे, रमेश रोटके, कैलास लुटे,मिताराम लांडगे, दिनेश पंचबुद्धे, शुभम वाघाये, विलास ढेंगे, मंगेश कानतोडे, सुरेश गिदमारे यांनी दिला आहे.
भाजप पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांने कुणबी समाजाबद्दल अनुदगार काढणे अयोग्य आहे. पक्षाने समाजाची माफी मागावी -जयकृष्ण फेंडरकर, अध्यक्ष, संत तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्था संपूर्ण कुणबी समाजाबद्दल अनुदगार काढणे पूर्णपणे अशोभनीय आहे.प्रचंड संताप आणणारी घटना आहे. कोणत्याही समाजाबद्दल असे बोलणे योग्य नाही.संबंधित पदाधिकाऱ्यावर भाजपने कारवाई करावी उमेश सिंगनजुडे, अध्यक्ष युवा कुणबी समिती म्हटलं आहे.
0 टिप्पण्या