डिजिटल गावकरी
नमस्कार मंडळी, महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीची संयुक्त सभा कोल्हापूरातून झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊ.
कोल्हापूरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वीच जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा
▪️लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
▪️शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
▪️प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
▪️वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!
▪️जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
▪️25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
▪️45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
▪️अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
▪️वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
▪️सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!
अश्या अनेक महत्वाच्या घोषणा सभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या