![]() |
Pm Mudra Loan Yojana Image |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ही एक महत्वपूर्ण सरकारी योजना आहे, जी 2015 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली आहे ज्याचा उद्देश सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम करणे आहे. देशातील लघु उद्योगांना भक्कम पायाभूत सुविधा प्रदान करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 20 लाखापर्यंत लोन देते जेणेकरून भारतामध्ये तुरून वर्ग व्यवसायाकडे वळत जाईल या योजनेची संपूर्ण माहिती या ब्लॉग मधे दिली आहे माहिती शेवटपर्यंत वाचा.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024 चे प्रमुख उद्दिष्ट लघु उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करायचा आहे, अशा उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळवता येतो. ही योजना विशेषत: शेतकरी, महिला उद्योजक, लघु व्यापारी, स्वयंरोजगार करणारे आणि नवीन स्टार्टअप्ससाठी एक चांगली योजना आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना लोनची श्रेणी
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तीन श्रेणींतर्गत कर्ज उपलब्ध करून देते.
1. शिश : रु. 50,000 पर्यंतचे कर्ज. हे मुख्यतः नवोदित व्यावसायिकांसाठी आहे, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे.
2. किशोर: रु. 50,001 ते रु. 5 लाखांपर्यंतचे कर्ज. हे विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
3.
4. तरुण : रु. 5,00,001 ते रु. ,2,0 लाखांपर्यंतचे कर्ज. हे व्यवसायाच्या मोठ्या विस्तारासाठी उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
1. व्यवसाय योजना तयार करा : व्यवसायाचा प्रस्ताव, त्याची गरज आणि अपेक्षित परिणाम याचे वर्णन करणारी योजना तयार करावी.
3. योग्य बँकेची निवड : सार्वजनिक, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका किंवा NBFC यांच्याकडे तुम्ही लोन साठी अर्ज करू शकता.
5.प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदाता ओळखपत्र
पत्ता पुरावा: रेशन कार्ड, विजेचा बिल, पासपोर्ट
व्यवसाय संबंधित कागदपत्रे
आर्थिक स्थितीचे पुरावे, स्टॅम्प पेपर, बिल जसे की बँक स्टेटमेंट
4. बँकेशी संपर्क साधा : तुमच्या निवडलेल्या बँकेत जाऊन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा. बँक तुमच्या अर्जाची छाननी करून कर्ज मंजूर करेल किंवा तुम्हाला अधिक माहिती विचारेल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन व्याजदर आणि परतफेड
मुद्रा लोनवरील व्याजदर बँकेनुसार बदलतात. सामान्यत: हे दर 8% ते 12% दरम्यान असू शकतात.
लोनची परतफेडीची कालावधी तुमच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार आणि बँकेच्या धोरणानुसार ठरवली जाते. काही प्रकरणांमध्ये तारण किंवा गहाण आवश्यक नसते.
मुद्रा लोनसाठी अधिकृत वेबसाईट आणि संपर्क क्रमांक
अधिकृत वेबसाईट
https://www.mudra.org.in
प्रधानमंत्री मुद्रा योजना हेल्पलाइन क्रमांक
1800-180-1111 किंवा 1800-11-0001
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे
1.तारणमुक्त कर्ज: बहुतेक प्रकरणांमध्ये कर्जासाठी कोणतेही तारण किंवा गहाण आवश्यक नसते.
2. सोपे अर्ज आणि जलद मंजुरी: अर्ज प्रक्रिया सोपी असून, कर्ज मंजुरी जलद होते.
4. व्यवसाय वाढीस चालना : व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत या लोंनमुळे मिळते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024 ही लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक प्रभावी आर्थिक साधन आहे. या योजनेचा लाभ घेऊन हजारो उद्योजकांनी आपले स्वप्न साकार केले आहे. जर तुम्हीही एक लघु उद्योजक असाल किंवा तुमच्या उद्योगाचा विस्तार करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर आजच प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करा आणि आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर पोहोचवा.
कर्ज घेण्यापूर्वी बँकेच्या सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि सल्लागाराची मदत घ्या.
0 टिप्पण्या