डिजिटल गावकरी
Vidhansabha 2024 :मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल लागले आणि हरियाणात भाजप सत्तेची हॅट्ट्रीक करणार हे स्पष्ट झालं. लोकसभेत बसलेल्या सेटबॅकनंतर हरियाणातला विजय भाजपला रिव्हाईवल देणारा आहे त्यामुळं भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जातेय. आता कट्टर विरोधक म्हणून भाजपनं काँग्रेसला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. पण या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरे गटानंही ही संधी सोडलेली नाही सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर थेट निशाणा साधण्यात आलाय जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकावं, अशा शब्दांत सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आलीय तर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग बाकीचे पक्ष आपली भूमिका घेतील, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिलाय.
त्यामुळं हरियाणात काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटानं काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याचं दिसून येतंय आहे आता जागावाटपातली बार्गेनिंग पॉवर वाढवणं मुख्यमंत्रीपदावरच्या दाव्यासाठी दबाव वाढवणं अशी उथळं काँग्रेसवरच्या टीकेसाठी देण्यात येत असली तरी ठाकरे गटाला यातून खोल विषय साध्य करायचाय, अशा चर्चा होत आहेत. हरियाणाच्या निकालावरुन काँग्रेसला टार्गेट करुन ठाकरे गटाला नक्की काय साध्य करायचं आहे हे जाणुन घेण्यासाठी डिजिटल गावकरीला सबस्क्राईब करा.
0 टिप्पण्या