Ratan Tata Death: आज राज्यात दुखवटा जाहीर! भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला! रतन टाटा यांची कारकीर्द.



डिजिटल गावकरी 

भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांचं आज निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. रतन टाटा यांनी संपूर्ण देशासाठी समाजकार्य केले जेव्हा जेव्हा देश्यावर आर्थिक संकट तेव्हा रतन टाटा यांनी आपली संपत्ती दान केली म्हणून आज गरीब लोकांपासून तर सामान्य लोकांमध्ये दुःखाची लहर पसरलेली आहे. तसेच रतनजी टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रतनजी टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज (10 ऑक्टोबर) एक दवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

जाणून घेऊयात रतन टाटांची थोडक्यात कारकीर्द


▪️ रतनजी टाटा 1961 च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले होते.

▪️ 1991 मध्ये रतनजी टाटा यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी निवड झाली.

▪️ रतनजी टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली.

▪️ 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. तसेच अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतनजी टाटांचं स्वप्न होतं.

▪️ यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना त्यांना सुचली.


▪️ 2008 मध्ये रतनजी टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली, त्यामुळेच रतनजी टाटांना नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जाते.

▪️ 2012 मध्ये रतनजी टाटांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला.

▪️ मात्र सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने 2016 मध्ये रतनजी टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी रुजू झाले.

▪️ रतनजी टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत


▪️ रतनजी टाटांचे बंधू नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत.


▪️ तसेच रतनजी टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


▪️ टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या