भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे पुढील आमदार हे असणारं | Gondia Bhandara Vidhansabha 2024 .

Gondia Bhandara vidhansabha 

डिजिटल गावकरी 
दुर्गाप्रसाद घरतकर 

नमस्कार मंडळी, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये भाजपाची जबरदस्त पिचेट झाली होती मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असलेल्या भाजपाला पक्षाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांमध्येही दारूण पराभव पत करावा लागला होता भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला तर काँग्रेसने तब्बल 25 वर्षांनी नंतर या मतदारसंघावर कब्जा केला होता त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि महायुती समोर मोठं आव्हान उभं राहिला आहे तर लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय त्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे विधानसभा निवडणुकीत कोणाचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे आणि इथले भावी आमदार कोण असू शकतात याचाच आढवा आपन घेणार आहोत.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा घेण्यापूर्वी आपण या जिल्ह्यातील भौगोलिक राजकीय परिस्थितीचा तसेच इथल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात तर बघा पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन इथे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली होती सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये तीन तर गोंदिया जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तुमसर भंडारा आणि साकोली हे विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात येतात तर अर्जुनी मोरगाव तिरोडा गोंदिया आमगाव हे मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यात येतात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता तर दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता तर एका मतदारसंघात भाजपाला विजय मिळवता आला होता मतदारसंघ न्याय पाहायचा झाल्यास तुमसर मध्ये राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत तर भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष नरेंद्र बोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे.(Gondia Bhandara vidhansabha election info updates 2024 ) साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विद्यमान आमदार आहेत अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजय राहले हे विद्यमान आमदार आहेत गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत त्यांचाही माहितीला पाठिंबा आहे तर आमगाव मध्ये काँग्रेसचे सहाश्रम कोरोटे हे विद्यमान आमदार आहेत एकंदरीत 2019 मध्येच इथे माहितीची मोठी पिछाड झालेली होती तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती तर दोन मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महायुतीला कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभ मतदारसंघांचा क्रमवार आढावा पुढील प्रमाणे आहे.

भंडारा जिल्हा विधासभा

तुमसर विधानसभा

भंडारा जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमसर तुमसर मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत राजू कारेमोरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणारे भाजपा नेते चरण वाघमारे यांचा 7000 700 मतांनी पराभव केला होता तत्पूर्वी 2014 मध्ये या मतदारसंघातून चरण वाघमारे हे भाजपाकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते त्यामुळे या मतदारसंघावरून माहिती मधील भाजपा आणि अजित पवार गटात रसिकेतच होऊ शकते तरीही विद्यमान आमदाराच्या निकषावर हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार हे निश्चित आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साकोली मधून काँग्रेस उमेदवाराला 9016 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे मात्र येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही .

भंडारा विधानसभा

भंडारा जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा भंडारा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष नरेंद्र भोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपाच्या अरविंद भालादरे यांचा 23677 मतांनी पराभव केला होता नरेंद्र भोंडेकर यांनी माहिती आणि शिंदे घाटालाही पाठिंबा दिला होता मात्र सध्या सर्व पर्याय खुले आहेत असं सांगत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला 22853 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला दिला जाऊ शकतो तसेच येथून ठाकरे गटाकडून नरेंद्र पहाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत परिस्थिती पाहता येथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे.

साकोली विधानसभा

भंडारा जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली कोली विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे नाना पटोले हे विद्यमान आमदार आहेत नाना पटोले हे या मतदारसंघातून 2019 मध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या परिणय फुके यांचा 6240 मतांनी पराभव करून विजय झाले होते दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 27366 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि नाना पटोले यांचं पराड जड दिसत आहे नाराजीचे काही मुद्दे सोडले तर ही निवडणूक नाना पटोले यांसाठी जर जाण्याची शक्यता नाही त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने पटोले हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही आहेत ही बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तसेच येथून नाना पटोले सहज बाजी मारू शकतात.

गोंदिया जिल्हा विधानसभा

अर्जुनी मोरगाव विधानसभा


भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता गोंदिया जिल्ह्याकडे वळूयात गोंदिया जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्जुनी मोरगाव अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या अर्जुनी मोरगाव मध्ये मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार गटात आहेत 2019 19 च्या विधानसभा निवडणुकीत मनोहर चंदिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवताना भाजपाच्या राजकुमार बडोले यांचा अवघ्या 718 मतांनी पराभव केला होता माहितीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळू शकतो मात्र भाजपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सोडली जाऊ शकते किंवा काँग्रेस इथे प्रबळ असल्याने काँग्रेसच्या नेत्यालाच उमेदवारी मिळू शकते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघ मधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 20658 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे .

तिरोडा विधानसभा

गोंदिया जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तिरोडा तिरोडा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजय राहानगडाले हे विद्यमान आमदार आहेत विजय राहा गडाले यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविकांत बोपचे यांचा 25963 मतांनी पराभव केला होता विजय राहानगडाले यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे दरम्यान मुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला 8938 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा भाजपासाठी सुरक्षित आहे तसेच विजय राहाडाले हे येथून विजयी चौकार ठोकण्याची शक्यता आहे मात्र त्यांना कडवा आव्हान मिळू शकतं.

गोंदिया विधानसभा

गोंदिया जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोंदिया गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत विनोद अग्रवाल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या गोपालदास अग्रवाल यांचा 27169 मतांनी पराभव केला होता पुढे विनोद अग्रवाल हे भाजपामध्ये दाखल झाले होते दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांमधून मायावतीला 35499 मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे इथे भाजपाच पारड जड दिसत आहे इथे विनोद अग्रवाल यांनाच भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर नुकतेच भाजपा मधून काँग्रेसमध्ये गेलेले गोपालदास अग्रवाल हे त्यांना आव्हान देतील अशी चिन्ह आहेत त्यामुळे येथेही अटीतटीची लढत अपेक्षित आहे मात्र सद्यस्थितीत येथे भाजपाचं पारडं जड आहे.

आमगाव विधानसभा

गोंदिया जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आमगाव अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेला आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात काँग्रेसचे सहासराम कोरोटे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी 2019 ला त्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या संजय पुराम यांचा 7420 मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे तसेच येथून काँग्रेसचे साहसराम कोरोटे हे पुन्हा एकदा आमदार बनू शकतात मात्र येथे आलटून पालटून आमदार बदलण्याची परंपरा मतदारांनी कायम राखली तर मात्र येथे भाजपाला विजय मिळू शकतो एकंदरीत परिस्थिती पाहता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी माहिती आणि भाजपाची कसोटी लागण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसला येथे वर्चस्व राखण्याची संधी सध्या तरी दिसत आहे आता या दोन्ही जिल्ह्यात कुठल्या पक्षाचं पारडं जड राहू शकतं आणि कोण विद्यमान आमदार असतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या