Soyabin Kapus Anudaan: ४९ lakh ५० हजार शेतकर्यांच्या बँक खात्यात सोयाबीन कापूस अनुदान जमा.



नमस्कार मंडळी, राज्यातील 96 लाख शेतकरी खातेदार जे सोयाबीन कापूस उत्पादक आहेत ते मागच्या काही दिवसापासून जवळपास दोन महिन्यापासून सोयाबीन कापूस अनुदान प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचं राज्य सरकारने मान्य केलेलं आहे घोषणा केलेली आहे निर्णय घेतलाय पण ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल याची वाट पाहत होते आणि त्याच्यावरती राज्य सरकारकडून कृषी विभागात कडून कृषिमंत्र्यांकडून तारीख पर तारीख असा खेळ चाललेला होता शेवटी 29 सप्टेंबर रोजी मुंबईतील कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं पण कालच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुद्धा याचं हे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काही जमा करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा असं वाटत होतं की अजून एक तारीख नवीन सरकारकडून दिली जाते का तर कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कालच्याच भाषणात स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यातील 96 लाख सोयाबीन कापूस उत्पादकांपैकी 68 लाख शेतकऱ्यांचं आधार ई केवायसी असेल किंवा आधारच संमतीपत्र असेल किंवा त्या संबंधीची जी काही कागदपत्र आहेत ती राज्य सरकारला प्राप्त झालेली आहेत त्यापैकी 65 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सकाळी साधारणतः बारा साडे अकरा बारा च्या दरम्यान हे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.

त्यामुळे आता इथून पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पात्र शेतकरी आहेत ज्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वरती पाच हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता यातले लाभार्थी किती आहेत पहिल्या टप्प्यात काल आता 65 लाख शेतकऱ्यांना अनुदान जमा होईल उद्यापासूनच असं सांगितलं होतं पण आज जी काही माहिती आपल्याकडे आलेली आहे जी आकडेवारी आहे जी राज्य सरकारनेच दिलेली आहे अधिकृतपणे ती अशी आहे की पहिल्या टप्प्यात 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यामध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत आता पहिला टप्पा हा 65 लाखांचा असेल 65 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र ठरतील आणि पात्र म्हणजे त्यांच्या खात्यात बँक खात्यावरती त्यांच्या जमा होतील पैसे असं वाटत होतं पण पहिल्या टप्प्यात म्हणजे आज आजपासून साधारणतः 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यामध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.

या अनुदानाबद्दल शेतकरी बऱ्याच दिवसाची वाट बघत होते की अनुदान कधी जमा होणार आहे तारीख पे तारीखचा खेळ चाललेला होता राज्य सरकारकडून प्रत्येक वेळेस तारीख एक वेगळी दिली जात होती पण तसं काही घडत नव्हतं त्यामुळे बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला होता पण शेवटी आता हे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याबद्दलच जे काही प्रत्येक अपडेट असेल म्हणजे अनुदान आता 49 लाख 50000 शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या