Rasan Card Online : घरबसल्या काढुन घ्या ई-रेशनकार्ड ते पन आपल्या मोबाईलवर.


Online Apply Rasan Card Download 
आपल्या देशात गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडचे रेशन कार्ड हरवल्यास कींवा रेशन कार्ड नसल्यास, तुम्ही घरबसल्या सहज यासाठी अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही.

आॅनलाईन राशन कार्ड ची कोणती कामे तूम्ही करू शकता पहा.

- घरबसल्या रेशन कार्डचे स्टेट्स तपासू शकता.
- कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावाचा रेशन कार्डमध्ये समावेश करू शकता.
- कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नाव रेशन कार्ड मधून कमी करू शकता.
- राज्य सरकारच्या वेबसाइटवरून ई-रेशन कार्ड डाउनलोड देखील करू शकता.

कोण करू शकते रेशन कार्डसाठी अर्ज ?

✔️भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते.
✔️१८ वर्षांखालील मुलांचे नाव पालक रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकतात.
✔️तसेच १८ वर्षांपुढील व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते.

असा करू शकता ऑनलाइन अर्ज

● रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.

● यानंतर Apply online for ration card या पर्यायावर क्लिक करा.

● रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स इत्यादी देऊ शकता.

● रेशन कार्डसाठी तुमच्याकडून ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल. अर्ज भरल्यानंतर शुक्ल भरून सबमिट करा.

● फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड मिळेल.

Online Rashan कार्ड काढणयासाठी कागदपत्रे

▪️ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ▪️हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स)
▪️पॅन कार्ड
▪️पासपोर्ट साइज फोटो
▪️उत्पन्नाचा दाखला
▪️पत्त्याचा पुरावा (वीजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमें अथवा पासबुक, भाडेकरार)

Online Rashan कार्ड अर्जाचे स्टेट्स असे तपासायचे

● रेशन कार्डसाठी अर्ज केल्यावर तुम्ही घरबसल्यास अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. यासाठी डिपार्टमेंट ऑफ फूडच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

● त्यानंतर Citizen Corner सेक्शनवर क्लिक करा.

● आता Track Food Security Application वर क्लिक करा.

● यातील चार पर्यायांपैकी एक भरा. आता तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या