E- Pik Pahni Update And Last Date 2024 : नमस्कार मंडळी,पीक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई, मदत निधी असेल किंवा हमीभाव खरेदीचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करावीच लागते. राज्यात २०२४ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी १ ऑगस्टपासून सुरू झालेलीय. ई पीक पाहणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत होती. आता मात्र ई पीक पाहणीला २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. त्याबाबत आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केली नाही, त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची शेवटची संधी आहे.
तरी शेतकर्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईल फोन ने ई पीक पाहणी करून घ्यावी नाहीतर तुम्हाला, पिक कर्ज, पिक विमा, शेतीची नुकसान भरपाई आणि अनेश शेतिविद्यक योजनांचा फायदा घेता येणार नाही.
ई-पिक पाहणीचे करण्याचे फायदे जाणुन घ्या.
पीक विमा: ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली आहे ते पीक विमा संरक्षणासाठी पात्र आहेत, जे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अनपेक्षित घटनांमुळे पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.
पीक कर्ज:ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण केली आहे ते सवलतीच्या व्याजदरावर पीक कर्ज घेऊ शकतात.
पीक नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली असल्यास ते भरपाईचा दावा करू शकतात.
ई-पिक पाहणी पूर्ण करण्यात अयशस्वी झालेले शेतकरी महत्त्वाचे सरकारी लाभ गमावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीला प्राधान्य देणे आणि ते अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
0 टिप्पण्या