दिवाळी 2024 : कधी आहे जाणुन घ्या दिवाळी तारीख, शुभमुहूर्त आणि दिवाळीचे महत्व.


दिवाळी 2024 साठी फोटो

दिवाळी 2024: दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि उत्साही सण आहे. हा सण प्रकाश, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा सण सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणणारा सण आहे या सणाला भगवान श्री राम यांची पूजा करतात तर 2024 मध्ये दिवाळी हा सण कधी साजरा केला जाणार आहे व त्याची शुभमुहूर्त आपण जाणुन घेणार आहोत.

दिवाळी शुभ मुहूर्त 2024

दिवस पहिला : धनतेरस२९ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार)

दिवस दुसरा : काली चौदसऑक्टोबर 30, 2024 (बुधवार)

दिवस तिसरा: नरक चतुर्दशी३१ ऑक्टोबर २०२४ (गुरुवार)

दिवस चौथा: दिवाळी (लक्ष्मी पूजन)१ नोव्हेंबर २०२४ (शुक्रवार)

दिवस पाचवा: गोवर्धन पूजा२ नोव्हेंबर २०२४ (शनिवार)

दिवस सहावा: भाऊबीज३ नोव्हेंबर २०२४ (रविवार)

या वेळी अमावस्या तिथी 31 रोजी दुपारी 3.22 वाजता सुरू होत आहे. विद्यापीठ पंचांग आणि ऋषिकेश पंचांग यांच्यानुसार, अमावस्या तिथी 31 रोजी दुपारी 3.22 वाजता सुरू होईल आणि अमावस्या तिथी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.23 वाजता संपेल. यामुळे 1 ला अमावस्या तिथीला प्रदोष आणि निशिथ काल यांना स्पर्श होत नाही. तर 31 रोजी प्रदोष काळापासून निशिथ काळापर्यंत राहील. शास्त्रानुसार 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणे आणि लक्ष्मीची पूजा करणे खूप फलदायी ठरेल.

दिवाळीची उत्पत्ती आणि महत्त्व


दिवाळीच्या उत्पत्तीबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले त्या दिवशी प्रजेने दीपोत्सव साजरा केला होता आणि त्यामुळे दिवाळीला रामाच्या परतीशी जोडले जाते.

दिवाळीचे महत्त्व फक्त पौराणिक कथांपुरते मर्यादित नाही. हा सण आपल्या आयुष्यात प्रकाश, आनंद आणि नवीन सुरुवात आणतो. हा सण आपल्याला आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबीयांच्यासोबत वेळ घालवण्याची एक उत्तम संधी प्रदान करतो आणि त्यामूळे भारतात मोठया आनंदाने हा दिवाळी सण साजरा केला जातो.

दिवाळीचे पाच दिवस

दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव आहे प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे.

धनत्रयोदशी: दिवाळीच्या पाच दिवसांची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि नवीन वस्तू खरेदी केल्या जातात.

नरक चतुर्दशी: या दिवशी रात्री दीपदान केले जाते आणि घरे सजवली जातात.

दिवाळी (अमावास्या): हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते आणि फटाके फोडले जातात.

गोवर्धन पूजा: या दिवशी भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोपांना पावसापासून वाचवले, याची आठवण म्हणून गोवर्धन पूजा केली जाते.

भाऊबीज: हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना तिलक लावून त्यांचे दीर्घायुष्य मागतात.

दिवाळीची सजावट



दिवाळीच्या वेळी घरे, दुकानं आणि मंदिरे सजवण्याची एक खास पद्धत असते. रंगोळी, दिवा, फुले यांचा वापर करून सजावट केली जाते याशिवाय, नवीन कपडे घालणे, फराळ बनवणे आणि भेटवस्तू देणे हीही दिवाळीच्या उत्सवाची भाग आहेत.

दिवाळीचा फराळ
दिवाळीच्या फराळ मिठाई फोटो

दिवाळीचा फराळ हा या सणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चकली, अनारसे, लाडू, शिरा, बर्फी हे काही लोकप्रिय फराळ आहेत. आजकाल बाजारात विविध प्रकारचे फराळ उपलब्ध असतात, काही लोक बाजारातून फराळ घेतात तर तरीही घरच्या हातचा फराळ खूपच स्वादिष्ट वाटतो.

दिवाळीची रंगोली

दिवाळी रांगोळी 2024 फोटो

रंगोळी ही दिवाळीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग आहे घराच्या दारासमोर आणि आंगणात रंगोळी काढण्याची परंपरा दिवाळीला आहे. रंगोळी शिवाय दिवाळी साजरी केली जाऊ शकत नाही दिवाळीला पऱ्येक घराच्या अंगणात सुंदर सुंदर रांगोळ्या काढून दिवाळी साजरी करतात.

दिवाळी गिफ्ट्स

दिवाळी गिफ्ट फोटो

दिवाळीच्या वेळी आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू नक्की देतो भेटवस्तू देणे ही आपल्या देशातील एक संस्कृती परंपरा आहे जी आजही चालु आहे
दिवाळीमध्ये अनेक मित्र, रिस्तेदार आणि कंपन्या आपल्याला गिफ्ट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

धनत्रयोदशी 2024


धनत्रयोदशी ही दिवाळीच्या पाच दिवसांची सुरुवात करणारा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला धन की देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी सोनं, चांदी किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

लक्ष्मी पूजन

लक्ष्मी पूजन हा दिवाळीचा मुख्य विधी आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. लक्ष्मी देवी धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानली जाते. लक्ष्मी पूजन करताना विविध प्रकारचे मंत्र, स्तोत्र आणि आरती गायले जातात.

दिवाळीची पारंपरिक पद्धती आणि बदलत्या पद्धती

आजकाल दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाले आहेत. आधुनिक काळात लोक दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात. मात्र, पारंपरिक पद्धतींचाही लोप झालेला नाही. आजही अनेक लोक पारंपरिक पद्धतीने आपल्याला पद्धतीनं देवाची पूजा करून दिवाळी साजरी करतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या