
Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाने विविध योजना ची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने 50 हजार योजनादूत निवडीसाठी 24-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येणारआहे व या निर्णयाला मान्यता पण देण्यात आलेली आहे तर आज आपण योजना दूत काय आहे ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासंबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक आणि मुख्यमंत्री जनकल्या कक्षाच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे, राज्यांमध्ये कार्यरत प्रशासकीय यंत्रणाला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहे
ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत साठी एक योजना दूत व 5000 हजार लोकसंख्येसाठी शहरी भागात एक योजना दूत अशा प्रकारे 50000 ची निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूत ला सरकारकडून 10000 हजार प्रति महिना एवढी ठोक मानधन देण्यात येणार आहे ( त्यामध्ये प्रवास खर्च वं सर्व असतील )
सरकारकडून निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत त्यासोबत सहा महिन्याचा करार केला जाणार हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढविला जाणार नाही.
मुख्यमंत्री योजना दूत भरती पात्रता
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष वयोगटातील असावे
उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक
संगणक ज्ञान असणे आवश्यक
उमेदवार कडे मोबाईल असणे आवश्यक
उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
उमेदवाराचे आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक
उमेदवाराचे बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक
मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी कागदपत्रे
मुख्यमंत्री योजना दूत या योजने करिता विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्धतीने केलेला अर्ज.
अर्जदाराचे आधार कार्ड
पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे दाखले किंवा प्रमाणपत्र
आधीवास प्रमाणपत्र
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
हमीपत्र (ऑनलाइन अर्ज सोबत असलेले हमीपत्र)
मुख्यमंत्री योजना दुत कोणते काम करेल
योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्क राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील
नेमणूक दिलेले ठिकाणी सक्षम जाऊन सरकारने ठरवून दिलेले कामे पार पाडणे बंधनकारक राहील
राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करते वेळेस ग्राम पातळीवरील यंत्रणाची समन्वय करून शासनाच्या योजनाची माहिती घरोघरी पोहचण्यासाठी प्रयत्न करतील
योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील
योजना दूत ला सोपीवलेले जबाबदाऱ्या स्वतःच्या स्वार्थासाठी/नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत
त्याचप्रमाणे गुन्हेगारी स्वरूपाचे/गैरवर्तन करणार नाहीत योजना दूत तसे करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
1 टिप्पण्या
Ggg
उत्तर द्याहटवा