महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज, कागदपत्रे, पात्रता संपुर्ण महिती.




महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती
नमस्कार मंडळी,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केलेली आहे ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला तीन सिलेंडर फ्री देण्यासाठी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये योजना मांडली आहे या योजनेने गरीब महिलांना महिन्याला आर्थिक मदत होईल तसेच या योजनेमुळे गरीब कुटुंबातील लोकांना स्वयंपाक करण्यासाठी त्यांना मदत होईल या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना जाहीर केली आहे या लाडकी बहिण योजनेसाठी ज्या महिला पात्र होतील त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कोठे सादर करायचा याची संपुर्ण महिती या लेखामध्ये दिली आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.

सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असेल.

एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.

सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळेल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

आधार कार्ड

राशन कार्ड

निवास प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

गॅस पुस्तक

1 साइज फोटो

इतर संबंधित कागदपत्रे लागतील

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कोठे करायचा.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही ऑनलाईन पोर्टल सुरू करायला असे जसे सुरू होईल तुम्हाला या वेबसाइटवरून कळवले जाईल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अधिक माहितीसाठी

आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय

ग्रमपंचायत कार्यालय

तालुका कार्यालय मध्ये माहिती घेऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या