BangladeshProtestnews:बांगलादेश आंदोलनामध्ये ३०० जणाचा बळी .


Bangladesh violence News
नमस्कार मंडळी,बांगलादेशात आंदोलन पेटलं आहे तेथील इंटरनेट सेवा बंद झाली असून ३०० जणाचा बळी गेला आहे. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा दिला आहे व त्या शेख हसीना देश सोडून भारतात आश्रयाला आल्या आहेत अशा बातम्यांनी आजचा दिवस गाजला. बांगलादेशमध्ये सध्या आरक्षण विरोधी प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे. पण, त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. एक म्हणजे गेल्या महिन्यात जो हिंसाचार झाला त्यामध्ये दोषींवर कारवाई आणि पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा. देशभरात कर्फ्यू लागलेला असूनही लाखो लोक आज बांगलादेशाच्या रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

हे आंदोलन कश्यामुळे सुरू झाले.

शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जातेएक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते आणि फसवणुक केली जात आहे आणि म्हणून है तीव्र आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू झाले आहे.

बांगलादेशच्या हसीना यांनी राजीनामा देऊनही आंदोलनाचा जोर कमी झाला नसून वाढता हिंसाचार आणि पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने निघालेला मोर्चा यामुळे आधी शेख हसीना यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आणि तिथून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. पण, आंदोलक अजूनही आंदोलनावर आडून आहेत व आंदोलन सुरू आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या