Nukshan Bharpai2024
नमस्कार मंडळी,जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 596 कोटी 21 लाख 55 हजार रुपये मंजूर केले आहेत. यामुळे या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
महारष्ट्र राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या सहा महिन्यांत एकूण २,१७,६९० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून त्यामुळे 3,54,765 शेतकरी बाधित झाले आहेत.
नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची मर्यादाही दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आली आहे.
राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी काही निकष लावले आहेत. त्यानुसार खरीप पिकांसाठी हेक्टरी 13600 रुपये, बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर 27000 रुपये आणि बारमाही पिकांसाठी हेक्टरी 36000 रुपये मदत दिली जाणार आहे.
यापूर्वीही अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत होते. या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर झालेल्या जिल्ह्यांची यादीही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती मात्र, पंचनामे वेळेत पूर्ण झाले नसून नुकसानीचे क्षेत्र अधिक असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सरकार तुटपुंजी मदत देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
राज्य सरकारने यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये पीक नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर केले होते. मात्र, अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
0 टिप्पण्या