अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना व्यवसायासाठी 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज.


Annasaheb Patil Mahamaandal karj
नमस्कार मंडळी अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना, तरुण उद्योजकांना 15 लाखांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देणारी महाराष्ट्र सरकारची योजना आहे
महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी 27 नोव्हेंबर 1998 रोजी ही योजना सुरू करण्यात आली
जर तुम्हाला भविष्यात उद्योगासाठी किंवा कोणत्या कारणासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही या योजनेतून लोन घेऊ शकता यासाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रिया व परतफेडीच्या अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेसाठी पात्रता.

पात्र होण्यासाठी, अर्जदार महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असले पाहिजेत

वय १८ ते ५० (पुरुष) किंवा ५५ (महिला) दरम्यान असायला पाहिजे.

त्यांनी अण्णा साहेब पाटील महामंडळ योजनेंतर्गत इतर कोणतेही लाभ घेतलेले नसावेत.

विद्यमान व्यवसायांना उद्योग आधार किंवा शॉप ॲक्ट लायसन्स यांसारखे आवश्यक परवाने असणेआवश्यक आहेत.

कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेता येईल.

अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना,कर्जाची रक्कम

कर्जाची रक्कम व्यवसाय आवश्यकता आणि बँक खात्याच्या तपशीलांवर आधारित बदलते, 2 लाख ते 15 लाखांपर्यंत येथून कर्ज भेटू शकतो.

अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना परतफेड

कर्जाचा परतफेड कालावधी पाच वर्षांचा असतो, ज्या दरम्यान कोणतेही व्याज आकारले जात नाही.

अर्ज प्रक्रिया

अण्णासाहेब आर्थिक महामंडळ योजना अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, त्यासाठी स्कॅन केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. कर्जाची रक्कम, मंजूर झाल्यास, थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेसाठी कागदपत्रे

वयाचा पुरावा,

पत्त्याचा पुरावा,

जातीचा दाखला

शैक्षणिक पात्रता,

अर्जदाराच् फोटो

बँक स्टेटमेंट्स आणि व्यवसायाशी संबंधित परवाने यासारखी आवश्यक कागदपत्रे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा

पहिल्यांदा तुम्ही वर नमूद केलेल्या पात्रता पहा.

पहिल्यांदा तुम्ही अण्णा साहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या 👇👇👇
https://udyog.mahaswayam.gov.in

आणि आवश्यक संपूर्ण माहिती भरा आणि स्कॅन केलेल्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरा आणि सबमिट करा.

यानंतर अधिकारी सबमिट केलेल्या माहितीची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.

आणि कागदपत्रे मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

तुम्हाला जर कोणत्याही शंका किंवा मदत हवी असेल तर तुम्ही अण्णा साहेब पाटील महामंडळाशी संपर्क साधा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेसाठी संपर्क नंबर आणि पत्ता

मुख्य कार्यालयीन पत्ता : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001

दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६५७६६२ ०२२-२२६५८०१७
या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती विचारू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या