ई-पिक पाहणी करणे गरजेचे आहे 15 सप्टेंबर पर्यंत आहे शेवटची मुदत.


नमस्कार मंडळी, 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सूर्वात झाली आहे आणि 15 सप्टेंबर पर्यंत ही ई पिक पाहणीची शेवटची तारीख आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर पीक विमा, नुकसान भरपाई, हमीभाव खरेदी, पीक कर्ज या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळं ई पीक पाहणी नोंदणी करणं आवश्यक आहे असे राज्य सरकारचे आदेश आहेत म्हणून लवकरात लवकर आपल्या शेतात जाऊन ऑनलाईन ई पिक पाहणी करून घ्या आता मोबाइलवरून ई पीक पाहणीची नोंदणी कशी करायची तेच आपण या लेखामध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत वाचा.

मोबाइलवरून ई पीक पाहणीची नोंदणी करण्याची पद्धत

पहिल्यांदा आपल्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store वरून "ई-पीक पाहणी" हे ॲप शोधा आणि ते डाउनलोड करा.

ॲप उघडून आपला मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती जसे की आपलं जिल्हा, तालुका, गावं तुमचे खाते क्रमांक अशी सर्व महीती भरून नोंदणी करा.

७/१२ ची माहिती भरून द्या आपल्या शेताच्या ७/१२ च्या माहितीनुसार पिकांची नोंदणी करा.

यामधे तुम्ही कोणते पीक, क्षेत्रफळ, लागवडची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती भरून द्या.

सर्व माहिती भरून झाल्यावर माहितीचा सबमिट करा.
नोंदणी करताना ७/१२ मधील माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
जर आपल्याला नोंदणी करताना कोणतीही अडचण येत असेल तर आपल्या तालुक्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या