Digital Gaavkari News
Write By: दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी , भाजपनं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांच प्रदेश अधिवेशन घेवून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल, त्या अधिवेशनात 'भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर ते शरद पवार आहेत,' अशी घणाणती टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली. त्याशिवाय 'उध्दव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत' अशी जहरी टीका करून ठाकरेंना ही डिवचलं. पण अमित शहांनी ठाकरे आणि पवारांवर केलेली ही घणाणती टीका आगामी विधानसभा निवडणुकांच्या सभांचा ट्रेलर आहे असा अंदाज बांधला जातोय. दरम्यान लोकसभेच्या अपयशाला विसरून आपल्या सगळ्यांना आक्रमकपणे विधानसभेला समोर जायचंय असा संदेश ही त्यावेळी शहांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला. मंडळी त्याचं वेळी देवंद्र फडणवीस यांनी "मैदानात उतरा अन् ठोकून काढा; मात्र एकच अट, हिट व्हिकेट नको" अश्या पद्धतीचं आक्रमक वक्तव्य करून एकप्रकारे ती निवडणूक भाजप कशी लढवणाऱ याचा अंदाज दिला आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा 2024 या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) चुरशीच्या लढाईच्या तयारीत आहे. भाजप पक्षाला आपल्या संधींबाबत खात्री असली तरी महाराष्ट्रातील हे पाच मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत या वेळी भाजपला महाराष्ट्रामध्ये हार मानावी लागली आहे त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणूक गाजवण्यासाठी विविध लोकहिताच्या योजना जाहीर केल्या आहेत पण आज आपण महाराष्ट्रातील अश्या पाच मतदार संघाची माहिती व इथे असलेले काँग्रेसचे राजकारण जाणून घेणार आहोत.
इस्लामपूर मतदार संघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेते जयंत पाटील यांनी 2008 मध्ये हा मतदासंघ स्थापन केल्यापासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघामध्ये जयंत पाटील 2009 , 2014 आणी 2019 च्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत म्हणून यांचा खोलवर रुजलेला प्रभाव या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं या संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टक्कर देण्यासाठी भाजपचा प्रबळ दावेदार नसल्यामुळे ही जागा भाजपला जिंकणे पक्षासाठी केव्हाही आव्हानात्मक आहे.
वरळी मतदार संघ
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत वरळीत ६७,४२७ मतांनी विजय मिळवला आणि राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांचा पराभव केला. महाविकास आघाडीची आघाडी कायम असल्याने ठाकरेंना ही जागा कायम राहण्याची अपेक्षा आहे, या मतदार संघामध्ये शिवसेनेची भूमिका चांगली असल्यामुळे भाजपसाठी ही जागा जिंकणे कठिण आहे .
मुंब्रा-कळवा मतदार संघ
हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असून, त्यांनी अनेकवेळा जिंकले आहे. आव्हाड यांना मुस्लीम समाजाचा भक्कम पाठिंबा आहे आणि या भागात त्यांचे मोठे राजकीय अस्तित्व आहे. आव्हाडांवर मात करणे हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल.
कर्जत-जामखेड मतदार संघ
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांची तारुण्य, सक्रियता आणि मतदारसंघाशी असलेला मजबूत संबंध त्यांना या मतदार संघामध्ये एक वेगळीच पॉवर देते. रोहित पवार नेहमीच अजित पवार गटावर तरुण पिढीच्या समस्यावरून आक्रमक होताना दिसतो यामुळे आज तरुण वर्गामध्ये रोहित पवार याचा क्रेझ निर्माण झाला आहे.आणि त्यामुळे रोहित पवारांच्या विरोधात प्रभावीपणे लढण्यासाठी भाजपला तगडा उमेदवार हवा असणार आहे .
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ
ही जागा कधीकाळी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा बालेकिल्ला होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी दोनदा जागा जिंकली आहे. मात्र, त्यांचा मुलगा रोहित पाटील आता निवडणूक लढवणार असल्याचे समजते. पाटील घराण्याचा वारसा आणि आर.आर.पाटील यांच्या स्वाभिमानी राजकारणाचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या मतदारसंघतील प्रभाव हा त्यांच्या मुलाच्या म्हणजे रोहित पाठील यांच्यावर आहे यामुळे या मतदार संघामध्ये भाजपा आपली बाजू जिंकणे खूप कठिण आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या प्रयत्नात हे पाच मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण करतील पक्षाने भूतकाळात निवडणुकीतील पराक्रम दाखवला असला तरी, या आव्हानांवर मात करण्यासाठी सुसूत्र रणनीती आणि मजबूत स्थानिक नेतृत्वाची आवश्यकता भाजपला असेल.
0 टिप्पण्या