Digital Gaavkari
Write By: दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यात निर्माण झालेले इटीयाडोह धरण हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीवर बांधले गेले आहे. हे धरण 1978 मध्ये पूर्ण झाले आणि त्याचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणीपुरवठा आहे. या धरणामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत प्रतिसेकंद 3220 घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला आहे.
या इटाडोह धरणाची उंची 129 मीटर असून त्याची साठवण क्षमता 5.20 टीएमसी आहे. या धरणामुळे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील 169 गावांना पिण्याचे पाणी मिळत आहे व या धरणामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आहे.
निसर्ग आणि पर्यटन
तसेच या धरणामुळे या परिसरातील जैवविविधता वाढली असून या धरणाला पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जात आहे या पावसाळ्यामध्ये या धरणाच्या बाजूने वेढलेली हिरवीगार डोंगरे आणि या डोंगराच्या मधातून निघणारे पांढरे शुभ्र धुके पर्यटकांना आकर्षित करत आहे या पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक येथे पाणी आणि हिरव्यागार निसर्गाचा आणि पांध्र्यासुभ धबधब्याचा आनंद घेण्यासाठी याठीकानी गर्दी करत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि इटीयाडोह डॅम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे गोंदिया जिल्ह्यातील घनदाट जंगलाच्या पाठीशी असलेल्या या जलाशयाच्या आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील कितीतरी पर्यटक वर्षभरातून भेटी देत असतात जर तुम्हाला सुद्धा या पावसाळ्यामध्ये या इटीयाडोह डॅम पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव याठिकाणी येऊन या निर्सगाचां आनंद घेऊ शकता.
0 टिप्पण्या