मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; कार्यभार स्वीकारताच घेतला हा मोठा निर्णय!
Digital Gaavkari
Narendra Modi Cabinet Live Updates पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.यामुळे किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी झाला असून याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी २०, ००० कोटींचा खर्च सरकारला आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरु हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं की, 'आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध आहोत.आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त काम करणार आहोत. यासाठीच आमचे सरकार आतापर्यंत काम करत आले आहे आणि पुढेही काम करत राहील.' किसान सन्मान निधीचा १६ वा हफ्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज सतरावा हफ्ता जारी करण्यात आला.

0 टिप्पण्या