Lakhpati Didi Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात. आणि त्याचबरोबर आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारने आता महिलांसाठी लखपती दीदी ही नवीन योजना सुरू केलेली आहे. दीड लाख रुपये पर्यंत जे बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तर नेमकी ही लखपदी दिली योजना काय आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्यामध्ये नोंदणी कशी करायची आहे आणि त्याचबरोबर यासाठी पात्रता काय असणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
लखपती दीदी योजना काय आहे?(lakhpati didi yojna)
१५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लखपती दीदी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ३ कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिना व्याजी आर्थिक मदत केली जात आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते. यामध्ये LED बल्ब तयार करणे, प्लुम्बिंग ची कामे तसेच ड्रोन रिपेअरिंग इ. टेक्निकल कामे शिकवली जाणार आहेत.
बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या महिलांना खरं तर लखपती दीदी म्हटले जाते, ज्या महिलेचे प्रति कुटुंब वर्षाचे उत्पन्न हे १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आपल्या देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीताराम यांनी ०१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाषणात सांगितले की, ०३ कोटी महिलांना Lakhpati Didi Yojana Maharashtra चा लाभ घेता येणार आहे. याच्या अगोदर ०२ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे ठरले होते, पण आता ते ०३ कोटी करण्याचे योजले आहे.
लखपती दीदी योजनेचे फायदे कोणते आहेत?
व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना व्यवसाय कसा सुरु करायचा आणि कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन या योजनेतर्फे केले जाते.
त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये त्यांना बजेट, गुंतवणूक व बचत यांसारख्या गोष्टींची माहिती देण्यात येते.
Lakhpati Didi Yojana Maharashtra ही योजना लहान कर्ज सुद्धा मिळवून देते, त्यामुळे महिलांना व्यवसाय, शिक्षण आणि इतर वेगवेगळ्या गरजांसाठी लहान कर्ज सहजपणे मिळून जाते. या योजनेतर्फे महिलांना परवडेल अशा किमतीत विमा संरक्षण सुद्धा दिले जाते. यामुळे त्या महिलांच्या कुटुंबाची सुरक्षा सुद्धा वाढते.
वेगवेगळ्या ठिकाणी भरवलेल्या विभागीय आउटलेट्स त्याचबरोबर ग्रुप लेलव्यांमध्ये महिलांच्या उत्पादनाची विक्री होण्यास मदत होते.
लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय आहे । Lakhpati Didi Yojana Eligibility
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पहिला तर अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक येऊ.
तसेच या योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.
लखपती दीदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट साईझ फोटो
आधार कार्ड
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
पॅन कार्ड
ई-मेल आयडी
बँक खाते
आय प्रमाणपत्र
लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत
Lakhpati Didi Yojana Maharashtra Online Apply :
लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सध्या कोणतीही अधिकृत वेबसाईट जाहीर केलेली नाही तसेच ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झालेले नाहीत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु झाले की, या पोस्टमध्ये त्यासंबंधित माहिती उपडेट करण्यात येईल.
लखपती दीदी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा पाहा.
Lakhpati Didi Yojana Maharashtra या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचे आहे.
याठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लखपती दीदी योजनेचा अर्ज कार्यालयामधून घ्यायचा आहे.
अर्ज घेतल्या नंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला येथे भरायची आहे आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडा.
सर्व कागदपत्र व अर्ज हे एकत्र करून त्याच कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्यानंतर त्यांच्याकडून अर्जाची पोच पावती घ्यायची आहे.
या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
0 टिप्पण्या