यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मिळणार ₹1 लाख 20 हजारांपर्यंत अनुदान



यशवंतराव चव्हाण मुक्त घरकूल योजना yashvantrao Chauhan gharkul Yojana information

महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात घरकुल योजना चालवत आहे यामध्ये गरीब लोकांना राहण्यासाठी घरकुल योजना प्रधान करता आहे महाराष्ट्र शासन इतर बहुजन मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागातर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना ₹1 लाख 20 हजारांपर्यंत अनुदान देत आहे. यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जातीच्या गरीब लोकांना या घरकुल योजनेचा लाभ मिळावा असा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेची अनुदान रक्कम

घर बांधणीसाठी
ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे: ₹1 लाख 20 हजार अनुदान मिळेल.

ज्यांच्याकडे जमीन नाही: ₹1 लाख 70 हजार (जमिनीचा खर्च यात समाविष्ट) मिळेल.

घर दुरुस्तीसाठी:₹50 हजार रुपये अनुदान मिळेल.

यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

महाराष्ट्रातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती
ज्यांच्याकडे घर नाही किंवा कच्चे, जीर्ण घर आहे
ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹6 लाखापेक्षा कमी आहे असे लोक या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Documents)

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे

ओळखपत्र (Identity Proof)

आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट

जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

विहित नमुनाचा जात प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र (जातीचा उल्लेख असलेले)

निवास प्रमाणपत्र

आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट
विद्युत बिल
टेलिफोन बिल
रेशन कार्ड

आर्थिक परिस्थितीचा पुरावा (Proof of Financial Status)

उत्पन्न प्रमाणपत्र (जसे की वेतनपत्रक, ITR इ.)
दारिद्र्य रेखा खालील (BPL) राशन कार्ड
बँक पासबुक

घर नसल्याचा पुरावा (Proof of Non-Ownership of House)


ग्रामपंचायत/नगरपालिकेचा निवास प्रमाणपत्र
जमीन नसल्याचा दाखला

इतर आवश्यक कागदपत्रे


पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्जाचा शुल्क भरणाऱ्याची पावती
जमीन खरेदीचा करार (जर जमीन खरेदी केली असेल तर)

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचं अर्ज कुठे करायचां?

(Yashwantrao Chavan Gharkul Yojana) समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे.सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.या करिता Online Application करता येणार नाही.पात्र लाभार्थ्यांनी आपल्या ग्राम पंचायत कार्यालयाकडे किंवा पंचायत समिती कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.संपूर्ण अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सदरचा अर्ज मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे जमा करावयाचा आहे. व आपल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधू शकता.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अधिकृत वेबसाइट
[https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/schemes](https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/schemes)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या