आता मुलांना वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लिहणे बंधनकारक महाराष्ट्र सरकारचा निर्णय


डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर

दिनांक 11 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री साहेबांनी काही निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक मोठा निर्णय म्हणजे, शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचे नाव लिहिण्यात येईल असे या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदिती कटरे छगन भुजबळ धनंजय मुंडे तसेच अनेक भाजपाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

या कॅबिनेटच्या बैठकीत 58 गिरण्यांमधील कामगारांची घरे, बीडीडी चाळ आणि झोपडपट्टी धारकांच्या घराच्या स्टॅम्प ड्युटीत कपात केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारने
1 मे 2024 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुलांसाठी आधार आणि पॅन कार्ड यांसारख्या सर्व सरकारी कागदपत्रे 
तसेच जन्माचा दाखला, शाळेचे कागदपत्र, संपत्तीची कागदपत्र अश्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव असणे अनिवार्य केले आहे.

याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की आपल्याला जन्म देण्यापासून आपल्याला मोठे करण्यात ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा असतो तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच्यामुळे अभिमान आहे आणि यापुढे आता प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक राहील आणि याची सुरुवात मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. आई नावाची शिदोरी सरत नसली तरी प्रत्येकासोबत नक्की उरावी यासाठी राज्य शासनाने घेतलेला हा एक पथदर्शी निर्णय असून त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करत आहोत. असे देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांनी त्या सभेमध्ये म्हटले तर त्याचबरोबर त्यांनी पाठीवर आपल्या नावानंतर आपल्या आईचे नाव आणि त्याच्यानंतर आपल्या वडिलांच्या नाव लिहून सभेमध्ये प्रदर्शित करून आईची ओळख आणि आईच्या दर्जा हा जगासमोर करून दिलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या