तुम्हीं फास्टॅग केवायसी केले का ?३१ जानेवारीनंतर होनार बंद.


फास्टॅग केवायसी केले का ? ३१ जानेवारीनंतर होईल बंद .

डिजीटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर

एनएचएआयकडून एक वाहन, एक फास्टॅग' याअंतर्गत
फास्टॅगद्वारे टोल वसुली सुलभरीत्या होण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची केवायसी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत करून घ्यावी अन्यथा फास्टॅग निष्क्रिय केले जातील किंवा ब्लॅक लिस्ट केले जातील, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

३१ नंतर फास्टॅग निष्क्रिय एनएचएआयने निवेदनात म्हटले की, वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची कागदपत्र केवायसी झाली आहे की नाही, याची खातरजमा करावी.
केवायसी केली नसेल तर ३१ जानेवारीच्या आत ती करून घ्यावी अन्यथा ३१ जानेवारीनंतर ज्या फास्टॅगची केवायसी केलेली नसेल तर तो फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅक लिस्ट करण्यात येणार आहे यामुळे केवायसी खातरजमा करावी, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.

मोबाईलने फास्टॅग केवायसी स्टेटस चेक कसं करायचं?


पहिल्यांदा फास्टॅगच्या https://fastag.ihml.com या अधिकृत वेबसाइटवर जा.

■ रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करा.

■ लॉग केल्यानंतर डॅशबोर्ड मेनूवर क्लिक करा.

■ डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला असलेला 'माय प्रोफाइल ऑप्शन निवडा.

■ 'माय प्रोफाइल पेजवर तुम्हाला तुमचे फास्टॅग डिटेल्स दिसतील.

■ जर तुमचं केवायसी पूर्ण झालेलं असेल तर केवायसी स्टेटस कम्प्लीट' दिसेल.

केवायसी बंधनकारक का केलें आहे

१ एनएचएआयकडून एक वाहन, एक फास्टॅग याअंतर्गत याचे नियोजन केले आहे. अनेक वाहनचालक एकच फास्टॅग

अनेक वाहनचालकांना वापरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने एक फास्टॅग एकाच वाहनाला वापरण्यात यावा यासाठी शासनाने केवायसी करणे बंधनकारक केले आहे तरीपण तुम्हीपण आपल्या वाहनाची केवायसी करून घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या