भरनोलीत रानटी हत्यांकडून ५ एकरांच्या धान पुंजण्याची नासाडी


गोंदिया जिल्हा

दुर्गाप्रसाद घरतकर


मागील वर्षीपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागनडोह परिसरात रानटी हत्यांचे संचार सुरू आहे
गतवेळी सुद्धा या हत्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणी करिता टाकलेल्या पऱ्यांची प्रचंड नुकसान झाली होती तर परत दिनांक ९ डिसेंबरला पुन्हा रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हतींनी स्थानिक गावालगत असलेल्या नीलकंठ बुद्धराम हरामी रा. भरणोली यांच्या ५ एकर शेतातील मळणीसाठी तयार केलेल्या धानाच्या पुंजण्याची प्रचंड नासधूस केले त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

संबधित वन विभागानेडतोब पंचनामा केला असून मौजा भरनोली येथे रात्रीच्या सुमारास आलेल्या २० ते २५ हत्तींच्या आलेल्या कळपाला झुगारून लावण्यासाठी गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली पीडित शेतकऱ्यांच्या दोन हेक्टर क्षेत्रातील धानाच्या पुंजण्याचा रानटी हत्यांनी भुईसपाट करून हातचा घास हिरावला गेला आहे..

आता शेतकऱ्यांसमोर आगामी वर्षभऱ्याचा कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा गहन व तितकाच गंभीर प्रश्न शेतकऱ्या
समोर पडला आहे. धानाच्या पुंजण्याची नासाडी केल्याल्यानंतर हतिचा कळप नागनडोह जंगलाच्या दिशेने गेले आहे हा कळप गोठनगाव , खैरी , सुकळी कलिमाती या जंगलाकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाने शेतकर्याना ज्यास्तीत ज्यास्त मदत देवून हत्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या